टाटा समूह आपला बॅटरी व्यवसाय वेगळा करण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आहे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार Agratas Energy Storage Solutions Pvt ची स्थापना स्वतंत्र युनिट म्हणून केली जाऊ शकते.
दरम्यान, या संपूर्ण योजनेमागे निधी उभारण्याची तयारी आहे. याशिवाय, भविष्यातील लिस्टिंगदेखील केलं जाऊ शकतं असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. असं मानलं जातंय की कंपनीची लिस्टिंग व्हॅल्यू सुमारे ५ ते १० बिलियन डॉलर्स नजीक असू शकतं. काही प्रमाणात ते कंपनीच्या वाढीवर आणि मार्केटच्या सेंटिमेंट्सवरही अवलंबून असेल. या संपूर्ण प्रकरणावर टाटा समूहाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण जर बॅटरीचा व्यवसाय वेगळा केला आणि तो शेअर बाजारात लिस्ट झाला तर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
Agratas Energy Storage Solutions Pvt ऑटोमोबाईल आणि एनर्जी सेक्टर्ससाठी बॅटरी बनवते. सध्या कंपनीचे यूके आणि भारतात युनिट्स आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, टाटा मोटर्स आणि त्याचे युनिट्स हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत.
ईव्ही बाबत काय आहे प्लॅन?
बॅटरी व्यवसायाव्यतिरिक्त, कंपनी आपला ईव्ही व्यवसाय देखील वेगळा करण्याचा विचार करत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, काही विद्यमान गुंतवणूकदारांना एक्झिट हवी आहे. रिपोर्टनुसार, ईव्ही व्यवसायाचं लिस्टिंग वेगळी होऊ शकते.