टाटा समूहाची कंपनी टायटनचा मल्टीबॅगर स्टॉकनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. शुक्रवारी, या शेअरनं जवळपास 3 टक्क्यांनी उसळी घेत 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचा शेअर 3144 रुपयांवर बंदझाला. या शेअरमधील जोरदार वाढीमुळे, दिवंगत गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी काही मिनिटांत सुमारे 500 कोटी रुपये कमावले.
शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअर्समध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं झुनझुनवाला कुटुंबाच्या संपत्तीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अवघ्या काही मिनिटांत, कंपनीत मोठे शेअरहोल्डिंग असलेल्या रेखा झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीत 494 कोटी रुपयांची वाढ झाली. टायटनचा स्टॉक हा राकेश झुनझुनवाला यांचा आवडता स्टॉक होता. या टाटा कंपनीच्या शेअरनंदेखील त्यांना शेअर बाजारात यशाचं शिखर गाठण्यासाठी मदत केली. राकेश झुनझुनवाला यांचं 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झालं.
रेखा झुनझुनवालांकडे किती शेअर्स?शेअरहोल्डिंगबद्दल सांगायचं झालं तर रेखा झुंझुवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर्स आहेत. त्यानुसार त्यांची कंपनीतील भागीदारी 5.29 टक्के इतकी आहे. अशा परिस्थितीत या शेअरच्या किमतीत वाढ झाल्याबरोबर झुनझुनवाला यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजच्या मते, टायटन कंपनीची कमाई वाढण्याची क्षमता आहे. यासोबतच त्यांनी बाय रेटिंग दिलं असून टायटनच्या शेअरसाठी 3,325 रुपयांचं नवीन टार्गेट प्राईज निश्चित केलेय.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)