Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA ची भन्नाट ऑफर! शेअर्स तारण ठेवा अन् मिळवा ५ कोटींपर्यंत कर्ज; पाहा, डिटेल्स

TATA ची भन्नाट ऑफर! शेअर्स तारण ठेवा अन् मिळवा ५ कोटींपर्यंत कर्ज; पाहा, डिटेल्स

TATA समूहातील एका कंपनीने शेअर्सवर कर्ज ही योजना सुरू केली असून, याचे प्रमुख लाभ जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:40 PM2022-05-26T13:40:12+5:302022-05-26T13:42:26+5:30

TATA समूहातील एका कंपनीने शेअर्सवर कर्ज ही योजना सुरू केली असून, याचे प्रमुख लाभ जाणून घ्या...

tata group tata capital introduced amazing offer digital loan against shares you can get loan up to 5 crore know all details | TATA ची भन्नाट ऑफर! शेअर्स तारण ठेवा अन् मिळवा ५ कोटींपर्यंत कर्ज; पाहा, डिटेल्स

TATA ची भन्नाट ऑफर! शेअर्स तारण ठेवा अन् मिळवा ५ कोटींपर्यंत कर्ज; पाहा, डिटेल्स

नवी दिल्ली: आताच्या घडीला TATA समूह अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ भारतीय बाजारपेठ नाही, तर शेअर मार्केटमध्येही टाटाच्या कंपन्या धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यातच टाटा समूहातील एका कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून, आता शेअर्स तारण ठेवल्यास ५ कोटींपर्यंतचे अर्ज मिळू शकते. टाटा समूहाच्या कोणत्या कंपनीने विशेष ऑफर आणली आहे, नेमकी काय ऑफर आहे? जाणून घ्या...

आघाडीची आर्थिक सेवा कंपनी आणि टाटा समूहाचा एक भाग, टाटा कॅपिटल लिमिटेडने शेअर्सवर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. टाटा कॅपिटलने एक परिपूर्ण, एकात्मिक डिजिटल आर्थिक सेवा म्हणून शेअर्सवर कर्ज देणाऱ्या पहिल्या आर्थिक संस्थांपैकी एक असून, आपल्या ग्राहकांना सहजसोपा, विनासायास अनुभव प्रदान करणे कंपनीचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. 

शेअर्सना ऑनलाईन तारण ठेवून ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

'शेअर्सवर कर्ज' ही योजना असून, कंपनीचे ग्राहक आपल्या डिमटेरियलाईज्ड शेअर्सना ऑनलाइन पद्धतीने तारण ठेवून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात, ज्याची सुविधा एनएसडीएलने दिलेली आहे. संबंधित डिपॉजिटरी पार्टीसिपंटकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. यासाठी ग्राहकांना फक्त टाटा कॅपिटलच्या वेबसाईटवर जावे लागेल, आणि याठिकाणी त्यांना मिळेल कागदपत्रे सादर करावी न लागता, वेगवान आणि सहजसोपा सेवा अनुभव. ग्राहकांच्या पोर्टफोलिओमधील शेयर्सच्या मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम कस्टमाइज केली जाईल.

या ऑफरचे काय काय लाभ मिळू शकतात?

- कर्ज तारणाच्या या प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत, रजिस्ट्रेशनपासून कर्ज खाते बनवले जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदरहित असते. 

- ऑनलाईन केवायसी आणि एनएसडीएलमार्फत शेयर्स गहाण ठेवले जातात.

- ई-एनएसीएच सुविधेसह कर्ज कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या केल्या जातात.

- ग्राहकांना कर्ज देणे, कर्जाची परतफेड, अतिरिक्त तारण ठेवणे आणि तारण ठेवलेले शेअर्स सोडवणे, यासाठी ऑनलाइन पोर्टल ज्याचा उपयोग करणे खूपच सोपे आहे.
 

Web Title: tata group tata capital introduced amazing offer digital loan against shares you can get loan up to 5 crore know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा