Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार, मर्जर प्रस्तावाला NCLT ची मंजुरी

टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार, मर्जर प्रस्तावाला NCLT ची मंजुरी

टाटा समूहाच्या एका कंपनीचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे. या कंपनीच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 02:12 PM2023-12-02T14:12:54+5:302023-12-02T14:14:12+5:30

टाटा समूहाच्या एका कंपनीचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे. या कंपनीच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

Tata group tata coffee limited company merge with TCPL kolkata NCLT approves merger proposal know details | टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार, मर्जर प्रस्तावाला NCLT ची मंजुरी

टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार, मर्जर प्रस्तावाला NCLT ची मंजुरी

टाटा समूहाच्या एका कंपनीचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे. टाटा समूहाची कंपनी-टाटा कॉफी लिमिटेडच्या (TCL) विलीनीकरणाच्या प्रस्तावाला एनसीएलटीनं मंजुरी दिली. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) कोलकाता खंडपीठानं टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि टीसीपीएल (TCPL) ब्रेवरीज अँड फूड यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती कंपनीनं दिली. टीसीएलनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कोलकाता खंडपीठानं १० नोव्हेंबर २०२३ रोजी विलीनीकरण योजनेला मंजुरी देणारा आदेश पारित केला. त्यांना १ डिसेंबर २०२३ रोजी ऑर्डरची प्रत मिळाली असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

काय आहे कारण?
ऑपरेशनल एफिशिअन्सी वाढविण्यासाठी आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर सुलभ करण्यासाठी हा विलिनीकरणाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. टाटा कॉफी सध्या खाद्य आणि पेय पोर्टफोलिओसह जगभरात ग्राहक उत्पादनांच्या व्यवसायात कार्यरक आहे. टीसीएल आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या मोठ्या प्रमाणात इन्स्टंट कॉफी, ब्रँडेड कॉफी आणि फॉफीच्या बागेच्या व्यवसायात काम करत आहेत.

व्हिएतनाममध्ये विस्ताराला मंजुरी
दरम्यान, टाटा कॉफीला व्हिएतनाममधील तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीची क्षमता वाढवण्यासाठी बोर्डाची मान्यता मिळाली आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. संचालक मंडळानं व्हिएतनाममध्ये अतिरिक्त ५,५०० टन 'फ्रीझ-ड्राय कॉफी' फॅसिलिटी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. टाटा कॉफीच्या व्हिएतनाम कंपनीची सध्याची क्षमता सुमारे ५,००० टन आहे. दरम्यान, एकूण क्षमतेपैकी ९६ टक्के क्षमतेचा वापर सुरू आहे.

Web Title: Tata group tata coffee limited company merge with TCPL kolkata NCLT approves merger proposal know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.