Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS चे बायबॅक सुपरहिट! १८ हजार कोटींच्या पुनर्खरेदीला प्रचंड प्रतिसाद; ४.५ पट ऑफर प्राप्त

TCS चे बायबॅक सुपरहिट! १८ हजार कोटींच्या पुनर्खरेदीला प्रचंड प्रतिसाद; ४.५ पट ऑफर प्राप्त

टीसीएसच्या शेअर बायबॅक योजनेत गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:09 AM2022-03-24T09:09:25+5:302022-03-24T09:10:50+5:30

टीसीएसच्या शेअर बायबॅक योजनेत गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.

tata group tata consultancy tcs 18000 crore buyback get good response from investors | TCS चे बायबॅक सुपरहिट! १८ हजार कोटींच्या पुनर्खरेदीला प्रचंड प्रतिसाद; ४.५ पट ऑफर प्राप्त

TCS चे बायबॅक सुपरहिट! १८ हजार कोटींच्या पुनर्खरेदीला प्रचंड प्रतिसाद; ४.५ पट ऑफर प्राप्त

नवी दिल्ली: TATA ग्रुपमधील अनेकविध अर्थांनी महत्त्वाच्या असलेल्या 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'चा (TCS) कंपनी शेअर बाजारात धुमाकूळ घालत असून, कंपनीच्या शेअर बायबॅकला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. शेवटच्या दिवशी एकूण शेअरच्या ४.५ पट शेअरची ऑफर कंपनीला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने या योजनेत सहभाग घेतला आहे.

TCS सारख्या एका मोठ्या कंपनीने शेअर पुनर्खरेदी म्हणजे ‘बायबॅक’ची १८ हजार कोटींची बंपर योजना जाहीर केली होती. बाजारभावापेक्षा साधारण १८ ते २० टक्के जास्त भावाने म्हणजे प्रति समभाग ४,५०० रुपये या दराने ही भागखरेदी करण्यात आले. टीसीएसचा सध्याचा बाजार भाव ३,६३३ रुपये इतका आहे. त्या तुलनेत तब्बल २४ टक्के वाढीव दराने कंपनी शेअरची पुनर्खरेदी करणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गुंतवणूकदारांचा मोठ्या संख्येने सहभाग

किरकोळ गुंतवणूकादारांचा विचार केला प्रत्येत ७ शेअरपैकी १ शेअर कंपनी स्वीकारेल. तर बिगर किरकोळ गुंतवणूकादारांसाठी १०८ शेअर पैकी १ शेअरची कंपनीकडून पुनर्खरेदी केली जाण्याची शक्यता आहे इतका प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे. टीसीएसच्या १८००० कोटी रुपयांच्या पुनर्खरेदीला (बायबॅक) ९ मार्च २०२२ पासून सुरवात झाली होती. २३ मार्च हा शेवटचा दिवस होता. 

दरम्यान, बायबॅकच्या माध्यमातून कंपनी गुंतवणूकदारांकडून ४० दशलक्ष शेअरची खरेदी करणार आहे. 'टीसीएस' यापूर्वी २०२० मध्ये १६००० कोटी रुपयांचा बायबॅक केला होता. त्यावेळी शेअर बायबॅकचे प्रमाण १०० टक्के होते. ज्या गुंतवणूकदारांनी यात सहभाग घेतला होता त्यांचे शेअर कंपनीने स्वीकारले होते.
 

Web Title: tata group tata consultancy tcs 18000 crore buyback get good response from investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.