Join us

Tata Group च्या 'या' कंपनीला मिळाली 7492 कोटींची ऑर्डर; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 8:22 PM

BSNLच्या 4G/5G नेटवर्कशी संबंधित उपकरणांची ऑर्डर, जाणून घ्या कंपनीचा व्यवसाय...

Tata Group News: टाटा ग्रुपची कंपनी तेजस नेटवर्क (Tejas Networks) च्या शेअर्स खरेदीमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. टाटा ग्रुप (Tata Group) च्या या कंपनीला 7,492 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तेजस नेटवर्क वायरलेस नेटवर्किंग प्रोडक्टचे प्रोडक्शन करणारी कंपनी आहे. विशेष म्हणजे, तेजस नेटवर्कला टाटा ग्रुपचीच दिग्गज टेक कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) कडून ही ऑर्डर मिळाली आहे.

शेअर्स 5 टक्क्यांनी वधारलेया बातमीनंतर तेजस नेटवर्कचा शेअर 7 टक्क्यांनी वाढून 866 च्या पातळीवर पोहोचला. याशिवाय कंपनीचे शेअर्स अजूनही 5 टक्क्यांच्या वाढीसह 850 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 893.30 च्या विक्रमी पातळीवर होते.

नेमका कशाचा करार केला ?तेजस नेटवर्कने BSNL च्या संपूर्ण भारतातील 4G/5G नेटवर्कसाठी रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) उपकरणांचा सप्लाय, सपोर्ट आणि वार्षिक देखभाल सेवांसाठी TCS सोबत करार केला आहे.

तेजस नेटवर्कचा व्यवसाय काय आहे?तेजस नेटवर्क 75 पेक्षा जास्त देशांमध्ये वायरलेस मॅन्युफॅक्चरिंग, वायरलेस नेटवर्किंग प्रोडक्ट्स, टेलीकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोवायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, यूटिलिटीस, डिफेंस आणि सरकारी संस्थांना वायरलेस नेटवर्किंगचे प्रोडक्ट पुरवते. टाटा समूहातील तेजसमध्ये बहुतांश शेअर्स टाटा सन्सची सहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टकडे आहे.

(डिस्क्लेमर: आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

 

टॅग्स :रतन टाटाटाटाव्यवसायगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारबीएसएनएल