Join us  

टाटा समूहाची आणखी एक झेप! लॉकहीड मार्टिनसोबत देशात हेलिकॉप्टर बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 2:21 PM

टाटा (TATA) म्हणजे देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता टाटा समूह नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातही पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे.

टाटा (TATA) म्हणजे देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता टाटा समूह नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातही पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. एअरबसच्या सहकार्याने गुजरातमध्ये वाहतूक विमाने तयार करण्याच्या तयारीत असलेल्या टाटा समूहाने आता भारतात आधुनिक हेलिकॉप्टर विकसित करण्याचे नियोजन सुरू केले आहे. संरक्षण क्षेत्रातील दिग्गज लॉकहीड मार्टिनशी कंपनी याबाबत चर्चा करत आहे. 

सिकोर्स्की S-76 विमाने भारतात तयार केली जातील. टाटाने अलीकडेच भारतात 40 C-295 विमाने तयार करण्यासाठी एअरबसशी करार केला. ही विमाने गुजरातमध्ये बनवली जाणार आहेत.

Electric Scotter: OLA आणि Bajaj ला टक्कर देणार Baaz, किंमत सर्वात कमी, वाचा फिचर

जर हा करार झाला तर लॉकहीड मार्टिन आणि टाटा समूहाने (TATA Group) F-16 विमानांचे पंख आणि C-130 विमानांचे भाग तयार करण्याचा करार या दोन कंपन्यांमधील दुसरा मोठा करार असेल. एका अहवालानुसार, सिकोर्स्की S76 साठी देशातील लहान कंपन्यांसाठी अनेक संधी असतील.

या करारामुळे मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या सरकारच्या योजनेला चालना मिळेल, लष्करासाठी हेलिकॉप्टर बनवणारे सिकोर्स्कीचे हे पहिलेच हेलिकॉप्टर असून, ते संरक्षण आणि नागरी दोन्ही क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे आणि जगभरात ते अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. सध्या या हेलिकॉप्टरला शिपिंग उद्योग आणि व्हीआयपींसाठी खूप मागणी आहे. ब्रिटन, जपान, स्पेन आणि सौदी अरेबियाचे सैन्य त्याचा वापर करतात.

टाटा (TATA) आणि एअरबस संयुक्तपणे C295 वाहतूक विमान गुजरातमधील वडोदरा येथे तयार करणार आहेत. यासाठी युनिटचे बांधकाम या महिन्याच्या शेवटी सुरू होईल. ही विमाने भारतीय हवाई दलाचा भाग असतील. प्लांटमध्ये फक्त C 295 तयार होणार नाही. हवाई दलाच्या गरजेनुसार भविष्यातील नवीन विमानेही येथे तयार केली जातील. एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स संयुक्तपणे या विमानाची निर्मिती करणार आहेत.

सप्टेंबर २०२१ मध्येच भारताने 56 C 295 वाहतूक विमानांसाठी एअरबसशी करार केला होता, हा संपूर्ण करार 21 हजार कोटी रुपयांचा होता. सरकार नवीन विमानांच्या जागी जुन्या झालेल्या Avro 748 विमानांच्या जागी काम करत आहे. 

टॅग्स :टाटाएअर इंडिया