टाटा कम्युनिकेशन्सने 486 कोटी रुपयांमध्ये अमेरिकेतील लाइव्ह व्हिडिओ प्रोडक्शन कंपनी 'द स्विच एंटरप्रायजेस'चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बुधवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या अधिग्रहणानंतर, टाटा कम्युनिकेशन्स 190 हून अधिक देशांत आणि भागांत द स्विचच्या ग्राहकांचे समर्थन करेल.
काय म्हणाली कंपनी? -
याच बरोबर, स्विचच्या 'लाइव्ह' उत्पादन क्षमतेमुळे संस्थांना स्पीड आणि कुशलतेने उच्च दर्जाची 'इमर्सिव्ह' सामग्रीचे उत्पादन करण्यास मदत मिळेल. या निवेदनात म्हण्यात आले आहे की, ''स्विच एंटरप्राइजेज एलएलसी, अमेरिका टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडची पूर्ण मालकी असलेली अप्रत्यक्ष उपकंपनी टाटा कम्युनिकेशंस (नेदरलँड) बीव्हीला आपली 100 टक्के हिस्सेदारी विकेल. याच बरोबर स्विचच्या अधिग्रहणाची एकूण किंमत 5.88 कोटी डॉलर अथवा 486.3 कोटी रुपये असेल.''
कंपनीच्या शेअर्सची स्थिती -
टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स आज गुरुवारी 1 टक्क्यांपेक्षा अधिक घसरून 1,267.25 रुपयांवर आले आहेत. यावर्षी YTD मध्ये हे शेअर्स 12.32 टक्क्यांनी कोसळले आहेत. हे शेअर्स एका वर्षात 10 टक्क्यांनी कोसळले आहेत.