Join us

टाटा समूह नेतृत्व करेल, अनुयायी बनणार नाही

By admin | Published: February 22, 2017 12:39 AM

टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. टाटा समूह कोणाचेही

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. टाटा समूह कोणाचेही अनुयायित्व पत्करणार नाही, सर्व व्यावसायिक क्षेत्रात नेतृत्वच करेल, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.५३ वर्षीय चंद्रशेखरन यांनी ७९ वर्षीय रतन टाटा यांची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी २४ आॅक्टोबर रोजी तत्कालिन चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून हाकलण्यात आले होते. रतन टाटा यांनी चेअरमनपदाचा हंगामी कार्यभार स्वीकारला होता. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या ‘बॉम्बे हाऊस’च्या बाहेर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही सर्व जण मिळून व्यवसायाच्या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यास काम करू. आम्ही सर्वांत पुढे राहू. आम्ही कोणाचेही अनुकरण करणार नाही. आम्ही नेतृत्व करू. मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध व्यवसायात असलेला टाटा उद्योग समूह १0३ अब्ज डॉलरचा आहे. समूहाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ही जबाबदारी सांभाळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सन्मानाची बाब आहे. आपल्या या नव्या भूमिकेत येणाऱ्या वर्षांत समूहाची सेवा करण्यासाठी मी तयार आहे. मला आपणा सर्वांचे पाठबळ हवे आहे. आपण सर्व जण मिळून चांगले काम करू शकू. (वाणिज्य प्रतिनिधी)टीसीएसचेही प्रमुखबॉम्बे हाऊसमध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारून चंद्रशेखरन यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.चंद्रशेखरन हे गेल्या तीन दशकांपासून टाटांचीच एक कंपनी टीसीएसमध्ये कार्यरत होते. टीसीएसला देशातील सर्वांत मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी बनविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. टाटा समूहातीलही ती सर्वांत मोठी कंपनी बनली आहे. टाटा सन्सचे चेअरमन झालेले चंद्रशेखरन यापुढेही टीसीएसचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.