Join us

टाटा समूह देणार ५ लाख नोकऱ्या : एन. चंद्रशेखरन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:29 PM

"इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसह अनेक नवीन उत्पादन प्रकल्प उभे करीत आहोत. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतील."

नवी दिल्ली : टाटा उद्योग समूह आगामी ५ वर्षांत सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि संबंधित उद्योगांच्या वस्तू उत्पादन क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग) ५ लाख नोकऱ्या निर्माण करेल, असे प्रतिपादन टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी केले. 

‘भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित एका परिसंवादात चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ‘सेमीकंडक्टर क्षेत्रासह प्रीसीजन मॅन्यूफॅक्चरिंग, जुळणी इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि संबंधित उद्योग या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या आधारे मला वाटते की, आम्ही ५ वर्षांत ५ लाख वस्तू उत्पादनाशी संबंधित नोकऱ्या निर्माण करू.’ चंद्रशेखरन यांनी सांगितले की, आसामात आम्ही सेमी कंडक्टर प्रकल्प उभे करीत आहोत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसह अनेक नवीन उत्पादन प्रकल्प उभे करीत आहोत. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतील.  

टॅग्स :टाटाव्यवसाय