Lokmat Money > बिझनेस न्यूज > Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश

Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश

Trent shares: टाटा समूहाची कंपनी ट्रेंटचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळतेय. बुधवारी ट्रेंटचा शेअर ३.३ टक्क्यांनी वधारून ८३१८.२५ रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:08 PM2024-10-09T16:08:48+5:302024-10-09T16:08:48+5:30

Trent shares: टाटा समूहाची कंपनी ट्रेंटचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळतेय. बुधवारी ट्रेंटचा शेअर ३.३ टक्क्यांनी वधारून ८३१८.२५ रुपयांवर पोहोचला.

TATA groups trent shares make history big buy since 2 days Expert Bullish share price up | Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश

Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश

Trent shares:  टाटा समूहाची कंपनी ट्रेंटचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळतेय. बुधवारी ट्रेंटचा शेअर ३.३ टक्क्यांनी वधारून ८३१८.२५ रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर २.३४ टक्क्यांच्या वाढीसह ८२३० रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १२ टक्के वाढ झालीये. या तेजीमागे एक सकारात्मक बातमी आहे. कंपनीनं नुकताच आपल्या वेस्टसाइड स्टोअर्समध्ये लॅब-डेव्हलप्ड डायमंड (एलजीडी) ब्रँड 'पीओएम'चा पायलट लाँच केलाय.

काय आहे सविस्तर माहिती?

पीओएम सध्या मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि गुरुग्राममधील निवडक वेस्टसाइड स्टोअर्समध्ये लाँच करण्यात आलाय. कंपनीला एलजीडी ज्वेलरी ब्रँड तयार करणं, ईबीओ रोल आउट करणं आणि स्केल-अपला गती देणं अपेक्षित आहे. मोठ्या किमतीच्या ब्युटी सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्यासाठी कंपनीनं झुडिओ ब्युटी नावाचं नवीन स्टँडअलोन स्टोअर फॉरमॅट लाँच केल्याच्या वृत्तानंतर शेअरमध्ये वाढ झाली आहे. या लाँचिंगमुळे झुडिओ ब्युटीची थेट स्पर्धा हिंदुस्थान युनिलिव्हरच्या एल १८, शुगर कॉस्मेटिक्स, हेल्थ अँड ग्लो आणि कलरबार या प्रस्थापित कंपन्यांशी होणार आहे. नव्या लाँचिंगमुळे ब्रोकरेजही यावर सकारात्मक दिसत आहेत.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

जागतिक ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनलीनं टाटा समूहाची उपकंपनी ट्रेंटवर 'ओव्हरवेट' कॉल कायम ठेवला आहे. ट्रेंट लिमिटेड टाटा समूहाचा भाग आहे आणि रिटेल कॉन्सेप्टचा पोर्टफोलिओ चालवते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: TATA groups trent shares make history big buy since 2 days Expert Bullish share price up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.