Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

६ महिन्यांमध्ये शेअरमध्ये २६० टक्क्यांची वाढ. आजही शेअरला लागलं अपर सर्किट.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:09 PM2024-03-05T14:09:46+5:302024-03-05T14:11:04+5:30

६ महिन्यांमध्ये शेअरमध्ये २६० टक्क्यांची वाढ. आजही शेअरला लागलं अपर सर्किट.

Tata Investment Corporation Ltd upper circuit for 4 days the result of Modi government s decision semi conductor factory gujrat | TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

Tata Investment Corporation Ltd share: टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि त्यांनी 8,838 रुपयांचा नवीन उच्चांकी स्तर गाठला. गेल्या चार ट्रेडिंग दिवसांपासून या शेअरमध्ये अपर सर्किट लागत आहे. या कालावधीत हा स्टॉक सुमारे 23 टक्क्यांनी वाढलाय. 
 

शेअर्सच्या या वाढीमागे मोदी सरकारची घोषणा आहे. खरं तर, गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा समूहाच्या दोन सेमीकंडक्टर प्लांट्सच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्सना दररोज अपर सर्किट लागत आहे.
 

काय आहेत डिटेल्स?
 

गेल्या आठवड्यात टाटा समूहाच्या दोन सेमीकंडक्टर प्लांटच्या प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता टाटा समूहाची टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानच्या प्रसिद्ध चिपमेकर - पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्प (PSMC) सोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅब तयार करेल. याशिवाय टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करणार आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे जी टाटा समूहासह विविध कंपन्यांच्या विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करते.
 

शेअर्सची स्थिती
 

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. गेल्या 3 महिन्यांत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना 120% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 260% पेक्षा जास्त, एका वर्षात 336% आणि गेल्या दोन वर्षांत 560% पेक्षा जास्त अधिक वाढला आहे. YTD या वर्षी स्टॉक 107% वाढला आहे. कंपनीचं मार्केट कॅप 44,718.65 कोटी रुपये आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Tata Investment Corporation Ltd upper circuit for 4 days the result of Modi government s decision semi conductor factory gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.