नवी दिल्ली : देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी टाटा माेटर्सने कामगार कपातीच्या दिशेने पाऊल उचलले असून, कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा स्वेच्छानिवृत्तीची (व्हीआरएस) याेजना आणली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने एकूण खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने ही याेजना आणली आहे. सध्या टाटा माेटर्सचे सुमारे ४२ हजार ५०० कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी पात्र ठरू शकतात. ही याेजना इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाेत्तम असून, आराेग्य विम्यासह इतरही सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीने याबाबत ई-मेल्सद्वारे कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. ‘व्हीआरएस’साठी पात्र कर्मचारी ९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, टाटा माेटर्सवर इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांवरील खर्चाचे माेठे ओझे आहे. याचा एकूण उत्पादन खर्चावरही माेठा परिणाम हाेत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बाेलले जात आहे.
यापूर्वी मिळाला नव्हता प्रतिसाद
टाटा माेटर्सने यापूर्वी दाेनदा व्हीआरएस याेजना आणली हाेती. सर्वप्रथम २०१५ आणि नंतर २०१७ मध्ये सादर केलेल्या याेजनेस फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. केवळ ३०० कर्मचाऱ्यांनीच याचा लाभ घेतला हाेता. कर्मचाऱ्यांकडून याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली हाेती. मारुती सुझुकीमध्ये सुमारे ३० हजार कर्मचारी आहेत; परंतु टाटा माेटर्सच्या तुलनेत कंपनीचे उत्पादन चार ते पाच पटीने जास्त आहे. त्यामुळे उत्पादकता जास्त असून, नफ्याचे प्रमाणही वाढलेले आहे.
टाटा माेटर्सकडून ‘व्हीआरएस’ ऑफर; निम्मे कर्मचारी ठरू शकतात पात्र
खर्च कमी करण्याचे धाेरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:07 AM2020-12-15T04:07:54+5:302020-12-15T06:51:34+5:30