नवी दिल्ली - देशातील बलाढ्य वाहन कंपनी टाटा मोटर्संने मोठी घोषणा केली आहे. प्रवासी इलेक्ट्रीक वाहन उद्योगात टीपीजी राईट क्लायमेट उद्योग समुहाद्वारे 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. टाटा मोटर्स उद्योगाच्या 9.1 अब्ज डॉलरपर्यंतच्या मुल्यांकनाच्या आधारावर ही रक्कम गुंतविण्यात येईल. कंपनीने म्हटले की, टाटा मोटर्स लि. आणि टीपीजी राईज क्लायमेटने यासंदर्भातील करार केला आहे.
टीपीजी राईट क्लायमेट आपली सह्योगी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या एडीक्यूसोबत टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. विविध टप्प्यांनी ही गुंतवणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात गुंतवणूक केल्यानंतर 18 महिन्यात उर्वरीत सर्वच गुंतवणूक पूर्ण होईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
.@TataMotors raises USD1 billion for its EV arm. Will fuel investments in BEV platforms. Good move!!@Tatamotorsev@TataMotors_Cars#ElectricVehicle#TATAMOTORShttps://t.co/amrZ4bRtnD
— Amit Panday (@amitspeakshere) October 12, 2021
इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटसाठी टीएमएल ईवीकंपनी (TML EVCo) ची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. टीजीपी राईट क्लायमेट आपल्या सह्योगी भागिदार कंपनीसोबत 11 ते 15 टक्क्यांची भागिदारी मिळविण्यासाठी 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या आधारावरच कंपनीचे इक्विटी मुल्यांकन 9.1 अब्ज डॉलर एवढं निश्चित करण्यात आलं आहे.