मुंबई : नॅनो प्रकल्प सुरू ठेवणार की बंद करणार, या प्रश्नावर टाटा मोटर्सने मौन बाळगणे पसंत केले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
नॅनो हा रतन टाटांच्या स्वप्नातील प्रकल्प आहे. एक लाख रुपयांत कार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प त्यांनी सुरू केला होता. तथापि, हा प्रकल्प कंपनीला आर्थिक संकटात घेऊन चालला असल्याचे आरोप होत आहे. कंपनीचे पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी या आरोपाला तोंड फोडले होते. नॅनोमुळे कंपनीला १ हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता त्यावर बोलण्यास कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरून टाळले जात आहे. प्रवासी वाहन (पीव्ही) क्षेत्रात २0१९पर्यंत पहिल्या तीन कंपन्यांत स्थान मिळविण्यासाठी कंपनीने नवीन धोरण स्वीकारले आहे. या धोरणात नॅनोला सोबत ठेवायचे की अलविदा करायचा याबाबत कोणी काही सांगण्यास तयार नाही. नव्या धोरणात कंपनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. अधिक वाहन प्रकारात उपस्थिती दर्शविणे आणि नफ्यात वाढ करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
नॅनोच्या भवितव्याबाबत टाटा मोटर्सचे मौन
नॅनो प्रकल्प सुरू ठेवणार की बंद करणार, या प्रश्नावर टाटा मोटर्सने मौन बाळगणे पसंत केले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
By admin | Published: February 7, 2017 01:53 AM2017-02-07T01:53:42+5:302017-02-07T01:53:42+5:30