Join us  

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तब्बल १५,००० कोटी गुंतवणार; १० नवीन प्रोडक्ट विकसित करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 5:28 PM

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेता टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेता टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स पुढील ५ वर्षांत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. "नेक्सॉन सारख्या वाहनांसह नव्याने उदयास येत असलेल्या ईव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने आगामी काळात या सेगमेंटमध्ये आणखी 10 नवीन उत्पादनं विकसित करण्याची योजना आखली आहे", असं टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले. त्यांच्या मते, ही उत्पादनं वेगवेगळ्या किंमती आणि ड्रायव्हिंग रेंजमध्ये असतील.

कंपनीने उभारला 1 अब्ज डॉलर्सचा निधीजोपर्यंत वेळ आहे, पुढील पाच वर्षांत आम्ही विद्युतीकरणासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करू, असं शैलेश चंद्र म्हणाले. यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या बॉडी स्टाईल, किंमतीचे स्तर, ड्रायव्हिंग श्रेणी पर्यायांसह सुमारे 10 उत्पादनांवर काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. कंपनीने EV विभागासाठी खाजगी इक्विटी कंपनी TPG कडून तब्बल 1 अब्ज डॉलर्सचा निधी उभा केला आहे, ज्यामुळे व्यवसायाचे एकूण मूल्य 9.1 बिलियन डॉलर्स इतका झाला आहे. औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील रहिवाशांना 101 इलेक्ट्रिक वाहनांची तुकडी देण्यासाठी स्थानिक गटांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात चंद्रा उपस्थित होते. एएमजीएम अंतर्गत 250 इलेक्ट्रिक वाहनांची ऑर्डर देण्यात आली आहे. चार्जिंग सुविधांसह ईव्ही इकोसिस्टमच्या विकासाला गती देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आणि ते विकसित करण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेबद्दलही त्यांनी भूमिका मांडली. चंद्रा म्हणाले की त्यांच्याकडे महाराष्ट्रात सुमारे 400 चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क आहे, त्यापैकी 15-20 औरंगाबादमध्ये आहेत आणि त्यांचा विस्तार करणे आवश्यक आहे.

नवीन कार खरेदीदारांचा ईव्ही वाहनांकडे कलइलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीदारांची आवड झपाट्यानं बदलत आहे आणि अनेक ईव्ही खरेदीदार असे आहेत जे प्रथमच कार खरेदी करत आहेत. जेव्हा आम्ही इलेक्ट्रिक कार लाँच केली, तेव्हा आमची पहिली कार म्हणून वापरणारे लोक फक्त 20-25 टक्के होते, आज हा आकडा 65 टक्के झाला आहे, असं चंद्रा यांनी सांगितलं. टाटा मोटर्सने आतापर्यंत 22,000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे आणि जर एवढ्या वाहनांचा प्रभाव कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या संदर्भात मोजला तर ते 1.5 लाख झाडे लावण्याइतके आहे. 

टॅग्स :टाटाइलेक्ट्रिक कार