Join us  

TATA चा जबरा प्लॅन! केवळ ४९ रुपयांत ३० दिवस फ्री मुव्हीज आणि बेव सीरिजचा लुटता येणार आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:26 PM

पाहा कोणता आहे ४९ रुपयांत ३० दिवस चालणारा आहे प्लॅन आणि कोणते मिळतायत बेनिफिट्स.

TATA Play : टाटा प्लेनं (Tata Play) अतिशय कमी किंमतीत OTT सर्व्हिस ऑफर करणारा प्लॅन लाँच केला आहे. मोबाइल डिव्हाईसेससाठी लाँच करण्यात आलेल्या या पॅकचं नाव Binge Starter Pack असं आहे. याची किंमत ४९ रुपये असून हा ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. मोबाईल डिव्हाईसेसवर ओटीटी कॉन्टेन्ट ऑफर करणारा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये कंपनी इरॉस नाऊ, हंगामा, शिमारू आणि झी ५ चं अॅक्सेस देते. हा प्लॅन सबस्क्राईब केल्यानंतर युझरना ओटीटी अॅप्सना Tata Play Binge अॅपद्वारे अॅक्सेस करता येऊ शकते.

७ दिवस फ्री ट्रायल४७ रुपयांच्या या स्टार्टर पॅकमध्ये, कंपनी ७ दिवसांचं फ्री ट्रायल आणि एकाच वेळी तीन मोबाइल डिव्हाइसवर अॅक्सेस करण्याची सुविधा देखील देत आहे. हा पॅक अॅक्टिव्हेट केल्यानंतर, ग्राहकांना Eros Now, Hungama, Shemaroome आणि Zee5 वर उपलब्ध वेब सीरीज आणि चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

हा प्लॅन केवळ मोबाइलमध्ये उपलब्ध असून तो टीव्हीवर स्टीम करता येणार नाही. याशिवाय अॅप्समधील कॉन्टेन्ट पाहण्यासाठी तुमच्या फोनमध्ये टाटा प्ले बिंज अॅप असणंही अनिवार्य आहे. इतर Binge प्लॅन्सप्रमाणे कंपनीचा नवीन स्टार्टर पॅक देखील केवळ Tata Play ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांकडे अॅक्टिव्ह DTH कनेक्शन असणे आवश्यक आहे. याद्वारेच तुम्ही तुमच्या मोबाईलवर टाटा प्ले बिंज अॅपचा कॉन्टेन्ट पाहू शकता.

टॅग्स :टाटामोबाइल