टाटा पॉवरचा शेअर गुरुवारी (6 जुलै) सुरुवातीच्या व्यवहारात 3 टक्क्यांनी वधारून 228.20 रुपयांवर पोहोचला आहे. टाटांच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर आली आहे. खरे तर, टाटा पॉवरने छत्तीसगडमध्ये 1,744 कोटी रुपयांचा स्मार्ट मिटरिंग प्रकल्प मिळाल्यासंदर्भात घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही ऑर्डर छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट्रिब्यूटर कंपनी लिमिटेडकडून (सीएसपीडीसीएल) मिळाल्याचे टाटा पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे.
काय आहे ऑर्डर -
कंपनीने दिलेल्या महितीनुसार, "टाटा पॉवरला छत्तीसगडमध्ये स्मार्ट मिटरिंग प्रकल्प राबविण्यासाठी 1,744 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. छत्तीसगड डिस्कॉम अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये तीन पॅकेजेससाठी CSPDCL कडून जारी करण्यात आलेल्या निविदांसाठी कंपनीला LoA जारी करण्यात आला आहे". यासंदर्भात टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी प्रवीर सिन्हा यांनी माहिती दिली.
हा प्रकल्प छत्तीसगडच्या रायपूर शहर आणि रायपूर ग्रामीण भागात 10 वर्षांत पूर्ण केला जाईल. महत्वाचे म्हणजे, कंपनी संबंधित भागांत 18.60 लाख मिटर लावेल आणि त्यांचे मेंटन्सदेखील करेल, असे निवेदनात म्हण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत डिझाइन, सप्लाय, स्थापना, कमिशनिंग, याशिवाय, कंझ्युमर स्तरावर आणि वितरण ट्रान्सफॉर्मर स्तरावर स्मार्ट मिटरच्या ऑपरेशन आणि देखभालीचा समावेश असेल. हा प्रकल्प आरडीएसएस अंतर्गत क्रियान्वित केला जाईल आणि यामुळे स्पेसिफाइड सेक्टरमध्ये एटी अँड सी घाट्यात सुधारणा आणि सीएसपीडीसीएलसाठी महसूलाच्या वसुलीत वाढ होणे अपेक्षित आहे.