Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! टाटाचा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

जबरदस्त! टाटाचा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

या डीलनंतर सोमवारी शेअर बाजार उघडल्यावर टाटा पॉवरचा स्टॉक रॉकेट होईल, असे मानले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:52 PM2022-04-14T21:52:41+5:302022-04-14T21:53:13+5:30

या डीलनंतर सोमवारी शेअर बाजार उघडल्यावर टाटा पॉवरचा स्टॉक रॉकेट होईल, असे मानले जात आहे.

Tata Power Renewable Energy Ltd, a subsidiary of Tata Power, is going to get a big foreign investment of 4,000 crores. | जबरदस्त! टाटाचा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

जबरदस्त! टाटाचा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

मुंबई – टाटा पॉवर(Tata Power) ची सबकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठी परदेशी गुंतवणूक होणार आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवरने गुरुवारी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांच्या समूहासोबत विदेशी गुंतवणुकीसाठी बंधनकारक करार केला आहे. या करारानुसार, टाटा पॉवरची रिन्यूएबल एनर्जी सब्सिडियरीमध्ये ४००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या कंपन्यांकडून येणार गुंतवणूक

टाटा पॉवरने बीएसईला सांगितले की, ब्लॅकरॉक व्यतिरिक्त, मुबाडला इन्व्हेस्टमेंट कंपनी देखील गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या समुहात सामील आहे. कंपनीने सांगितले की, 'BlackRock Real Assets मुबाडलाच्या सहकार्याने ४००० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक टाटा पॉवर रिन्युएबल्समधील १०.५३ टक्के  भागीदारीच्या बदल्यात असेल. या करारांतर्गत, टाटा पॉवर रिन्युएबल्सचे मूल्य ३४ हजार कोटी रुपये आहे.

आजपासून ४ दिवस शेअर बाजार बंद

या डीलनंतर सोमवारी शेअर बाजार उघडल्यावर टाटा पॉवरचा स्टॉक रॉकेट होईल, असे मानले जात आहे. शेअर बाजार आज ते रविवार बंद आहे. दर आठवड्याला शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. या आठवड्यात गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजारात कोणताही व्यवहार झाला नाही. यानंतर गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारीही बाजारपेठेत व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे आता सोमवारी थेट बाजार उघडेल आणि त्यानंतर टाटा पॉवरच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते.

टाटा पॉवरच्या सीईओंचा आनंद गगनात मावेना

या गुंतवणुकीवर भाष्य करताना, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे ​​सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, “टाटा पॉवर रिन्यूएबल्स ही पुढच्या पिढीतील व्यवसायांचा ब्रॉड एंड डिप पोर्टफोलिओ असलेला इंडस्टीत अग्रेसर असेल. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे आणि झपाट्याने वाढ करण्यास सक्षम आहे. मी BlackRock रिअल इस्टेट आणि मुबाडलाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. ही भागीदारी आम्हाला येत्या दशकांतील रोमांचक संधींचा फायदा उठवण्यास मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टीप : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Tata Power Renewable Energy Ltd, a subsidiary of Tata Power, is going to get a big foreign investment of 4,000 crores.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.