टाटा समूहाची कंपनी Tata Power ला सरकारकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या वृत्तानंतर, Tata Power च्या शेअर्सची खरेदी अचानक वाढली आहे. गुरुवारी Tata Power च्या शेअरची किंमत एक टक्क्यापेक्षा अधिक वाढून 247.55 रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 79,100 कोटी रुपये एवढे आहे.
Tata Power ला मिळाली मोठी ऑर्डर-सरकारी मालकीच्या SJVN लिमिटेडकडून टाटा पॉवर सोलर सिस्टीमला 5,500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 1000 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी, सोलर इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (EPC) संदर्भात आहे. ही ईपीसी ऑर्डर 'मेक इन इंडिया' बॅटरी आणि मॉड्यूल्सचा वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
24 महिन्यांची डेडलाईन - हा प्रकल्प नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या CPSU योजनेंतर्गत विकसित केला जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानात 5,000 एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या प्रोजेक्टचे लक्ष्य 22,87,128 किलो कार्बन उत्सर्जन कमी करणे असे आहे. यापासून वर्षाला जवळपास 250 कोटी युनिट एवढी वीज तयार होईल.