Join us

Air India Handover: 'Tata रहे मेरा दिल...', देशाच्या ऐतिहासिक डीलवर Amul चं हटके कार्टुन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 6:10 PM

जवळपास ७ दशकांनंतर एअर इंडियाची (Air India) मालकी पुन्हा एकदा टाटा ग्रूपकडे आली आहे. गेल्या आठवड्यात टाटा ग्रूपकडे एअर इंडियाची संपूर्ण मालकी हस्तांतरीत करण्यात आली.

नवी दिल्ली-

जवळपास ७ दशकांनंतर एअर इंडियाची (Air India) मालकी पुन्हा एकदा टाटा ग्रूपकडे आली आहे. गेल्या आठवड्यात टाटा ग्रूपकडे एअर इंडियाची संपूर्ण मालकी हस्तांतरीत करण्यात आली. देशातील या मोठ्या आणि ऐतिहासिक व्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. रतन टाटा यांच्यापासून आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या हटके कार्टुनसाठी ओळख असलेल्या लोकप्रिय अमूल डेयरी ब्रँडचं नाव देखील आता यात सामील झालं आहे. अमूल कंपनीनं हटके अंदाजात इंस्टाग्राम अकाऊंटवर एक कार्टुन शेअर केलं आहे ज्यास अनेकांची पसंती देखील मिळत आहे. 

अमूल कंपनीनं टाटा आणि एअर इंडियाच्या ऐतिहासिक डीलवर एक कार्टून तयार केलं आहे. कार्टूनमध्ये सर्वात वरच्या बाजूला बॉलीवूडमधील एका जुन्या गाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात 'गाता रहे मेरा दिल' ऐवजी 'टाटा' रहे मरे दिल', असा उल्लेख केला आहे. यात टाटा ग्रूपचे चेअरमन एन.चंद्रशेखरन आणि महाराजाचंही कार्टून तयार करण्यात आलं आहे. तसंच Amul in Good Hands असाही उल्लेख करण्यात आला आहे. 

अमूल नेहमीच समाजातील विविध घटना आणि विषयांवर कार्टूनच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली जाते. यात 'अमूल गर्ल' हे पात्र देखील प्रचंड लोकप्रिय आहे. यावेळी अमूल गर्लला विमानाच्या कॉकपिटमध्ये दाखवण्यात आलं असून कॉकपिटमध्ये महाराजा आणि टाटाचे चेअरमन एन.चंद्रशेखरन देखील दिसतात. 

टॅग्स :टाटाएअर इंडियाएअर इंडिया निर्गुंतवणूक