Join us

तोट्यातून नफ्यात आली TATAची 'ही' कंपनी, आता शेअर खरेदीसाठी उड्या; २ दिवसांत ४०% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:20 AM

Tejas Networks Ltd Share: मंगळवारी कंपनीचे शेअर्स 20% वाढून 1,086.90 रुपयांवर पोहोचले. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे.

Tejas Networks Ltd Share: तेजस नेटवर्क्स लिमिटेडचे (Tejas Networks Ltd) शेअर्स सतत्यानं फोकसमध्ये असतात. मंगळवारी कंपनीचे शेअर्स 20% वाढून 1,086.90 रुपयांवर पोहोचले. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. याआधी सोमवारीही या शेअरमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. म्हणजेच हा शेअर अवघ्या दोन दिवसांत ४० टक्क्यांनी वाढलाय. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. प्रत्यक्षात मार्च तिमाहीत कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे. कंपनीनं सोमवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. 

अधिक माहिती 

तेजस नेटवर्कनं मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत 146.78 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी कंपनीला 11.47 कोटी रुपयांचं नुकसान झालं होते. कंपनीच्या वायरलेस सेगमेंटच्या नेतृत्वाखालील सर्व उत्पादन विभागांमध्ये वाढ दिसून आली. कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या 299.32 कोटींवरून 343 टक्क्यांनी वाढून 1,326.88 कोटी रुपये झालाय. 

कंपनीची व्याज आणि करापूर्वीची कमाई वार्षिक आधारावर 669 टक्क्यांनी वाढून 248 कोटी रुपये झाली. तर चौथ्या तिमाहीच्या शेवटी ऑर्डर बुक 8,221 कोटी रुपये होतं. भारताची ऑर्डर बुक 7,958 कोटी रुपये होती तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय 263 कोटी रुपये होता. दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (PLI) अंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीला 32.66 कोटी रुपयांचं प्रोत्साहन मिळाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

कंपनीचा व्यवसाय 

तेजस नेटवर्क्स (Tejas Networks) 75 हून अधिक देशांमध्ये टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, संरक्षण आणि सरकारी संस्थांसाठी वायरलेस आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादनं तयार करते. तेजस नेटवर्कमध्ये बहुतांश हिस्सा हा टाटा सन्सची सब्सिडायरी पॅनाटोन फिनव्हेस्टकडे आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार