नवी दिल्ली : टाटा केमिकल्सने आपला युरिया व्यवसाय नॉर्वेच्या यारा उद्योग समूहाची भारतीय उपकंपनी यारा फर्टिलायझर्सला विकला आहे. २,६७0 कोटी रुपयांत हा व्यवहार झाला.
टाटा केमिकल्सने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. कंपनीच्या संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील बबराला येथील युरिया आणि अन्य उत्पादनांचा प्रकल्प एकत्रितरीत्या यारा फर्टिलायझर्सला विकण्यात आला आहे. आॅडिट समितीने हा प्रकल्प विकण्याची शिफारस केली होती. ती संचालक मंडळाने स्वीकारली आहे, असे टाटा केमिकल्सच्या निवेदनात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
या सौद्यास अद्याप नियामकीय आणि अन्य मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. या सौद्याला उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यांचीही परवानगी लागणार आहे. या सौद्यानुसार, कंपनीची सर्व मालमत्ता, देणी आणि करार यांचे यारा इंडियाकडे हस्तांतरण होईल.
हा सौदा २,६७0 कोटी रुपयांचा असून, सौदा पूर्ण करतेवेळी यापैकी काही रकमेचे समायोजन केले जाऊ शकते. टाटा केमिकल्सने म्हटले की, ‘युरिया व्यवसायाच्या विक्रीमुळे कंपनीचे मूल्य वाढेल, तसेच बॅलन्सशीट मजबूत होईल. वृद्धीची शक्यता वाढण्यास त्यामुळे मदत होईल.’
टाटाने युरिया व्यवसाय विकला
टाटा केमिकल्सने आपला युरिया व्यवसाय नॉर्वेच्या यारा उद्योग समूहाची भारतीय उपकंपनी यारा फर्टिलायझर्सला विकला आहे. २,६७0 कोटी रुपयांत हा व्यवहार झाला.
By admin | Published: August 11, 2016 02:08 AM2016-08-11T02:08:47+5:302016-08-11T02:08:47+5:30