Lokmat Money > बिझनेस न्यूज > एनसीएलटीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्स सुप्रीम कोर्टात जाणार

एनसीएलटीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्स सुप्रीम कोर्टात जाणार

सायरस मिस्त्री प्रकरण : फेरनियुक्तीला देणार आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:34 AM2019-12-20T05:34:15+5:302019-12-20T05:34:26+5:30

सायरस मिस्त्री प्रकरण : फेरनियुक्तीला देणार आव्हान

Tata Sons to go to Supreme Court against NCLT verdict | एनसीएलटीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्स सुप्रीम कोर्टात जाणार

एनसीएलटीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्स सुप्रीम कोर्टात जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने (एनसीएलएटी) टाटा सन्सच्या कार्यकारी चेअरमनपदावरील एन. चंद्रशेखरन यांची नेमणूक बेकायदेशीर ठरवून सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर चंद्रशेखरन यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून या प्रकरणी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल, असे म्हटलेय. याचाच अर्थ टाटा सन्स या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
चंद्रशेखरन यांनी ई-मेलमध्ये म्हटले, निकालात माझ्या नियुक्तीबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. टाटा सन्सला विश्वास आहे की, बाजू बळकट असल्याने आम्ही योग्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करू.
चंद्रशेखरन यांनी म्हटले, टाटा समूहाला मजबूत आणि अधिक गतिमान करण्यासाठी आपण मार्गक्रमण करीत आहोत. मी तुम्हाला विनंती करतो की, व्यवसायावर व आपल्या हितधारकांवर लक्ष केंद्रित करा.
टाटा सन्स ही टाटा समूहाची मुख्य कंपनी असून तिचा अध्यक्ष हा संपूर्ण टाटा समूहाचा अध्यक्ष असतो. १८.४० टक्के भांडवल शापूरजी पल्लनजी मिस्त्री कुटुंबीयांकडे आहे. टाटा समूहाच्या कंपन्या व ट्रस्टकडे जवळपास १५ टक्के भांडवल असून उरलेले भांडवल वित्तीय संस्था व जनतेकडे आहे.

मिस्त्री दाखल करणार कॅव्हेट
सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्स सर्वोच्च न्यायालयात जाणार हे गृहीत धरून तिथे कॅव्हेट दाखल करण्याचे ठरविले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयास ख्रिसमसच्या सुट्या लागल्यामुळे मिस्त्री यांना
२ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. कॅव्हेट दाखल करण्याच्या योजनेला मिस्त्री यांच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.

Web Title: Tata Sons to go to Supreme Court against NCLT verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.