नवी दिल्ली : टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक येत्या सोमवार आणि मंगळवारी होत असून, त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांनी सुरू केलेली कायदेशीर लढाई, एअर इंडियासाठी लावलेली बोली तसेच विस्तारा आणि एअर एशिया यांच्याबरोबरचे सहकार्य हे प्रमुख विषय असतील. यावेळी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना समूहाच्या आगामी वाटचालीबाबत एक प्रेझेंटेशनही दाखविले जाणार आहे. याशिवाय टाटा ग्रूपतर्फे डिजिटल बिझिनेसमध्ये पदार्पण करण्याबाबतही कँग्लोमेरेट या कंपनीबरोबर सुरू असणारी चर्चा आणि त्यासाठी उपलब्ध करून द्यावयाचे अर्थसहाय्य याबाबतही चर्चा होणार आहे. युनिकॉर्न बिग बास्केटचे ८० टक्के समभाग खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. याप्रकल्पाच्या खरेदीसाठी ॲमेझाॅन व रिलायन्स रिटेल हे सुद्धा उत्सूक असून प्रयत्न करीत आहेत.
टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 2:59 AM