देशात पुन्हा कोरोनाची लाट य़ेण्याची शक्यता एम्ससह नीती आयोगानेही वर्तविली आहे. यामुळे कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहणार असल्याने टाटा ग्रुपची मोठी कंपनी टाटा स्टीलने कर्मचाऱ्यांना घरूनच 365 दिवस काम करण्याची मुभा दिली आहे. यासाठी एक नवीन मॉडेल रविवारपासून लागू करण्यात आली आहे.
टाटा स्टीलने दिलेल्या एका वक्तव्य़ामध्ये याची माहिती देण्यात आली आहे. कंपनी विश्वास आणि परिणाम देणाऱ्या कामाची संस्कृतीकडे पाऊल टाकत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण व लवचिकता मिळेल.
एक नोव्हेंबरपासून टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांना आता एक वर्षात कितीही दिवस घरातून काम करण्याची सुविधा मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना एखाद्या विशेष स्थानावर काम करावे लागते. कंपनीने सांगितले की, जेव्हा कधी महामारीचे संकट संपेल व परिस्थिती सुधारल्यावर कंपनीचे हे कर्मचारी त्यांच्या इच्छित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी तयार असतील. यामुळे या कर्मचाऱ्यांना देशातील कुठूनही काम करण्याची सुविधा दिली जाईल.
कंपनीने सांगितले की, या नवीन योजनेचे एक वर्षात परिक्षण केले जाईल. यानुसार उत्पादकता आणि प्रतिक्रिया पाहून एक वर्षानंतर पुन्हा याचा अभ्यास केला जाईल. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष सुरेश दत्त त्रिपाठी यांनी सांगितले की, महामारीने उत्पादकतेच्या पारंपरिक विचाराला दूर करण्यास मदत केली आहे. या काळात अनेक मिथके तुटली आहेत. यामुळे नीती आणखी चांगले काम आणि जीवनाचे संतुलन राखण्यास मदत करणार आहे.
रतन टाटा कामगार कपातीविरोधात
कोरोना काळात कंपन्यांमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. यावरून असे वाटत आहे की, कंपन्यांच्या मुख्य नेतृत्वाकडे सहानुभूतीची कमतरता झाली आहे. ज्या लोकांनी त्यांचे पूर्ण करिअर कंपनीसाठी खर्ची घातले त्या लोकांना पाठिंबा देण्याऐवजी बेरोजगार केले जात आहे, असा आरोप टाटा यांनी केला आहे. टाटा यांनी उद्योगविश्वातील या उद्योगपतींना एक प्रश्न विचारला आहे. कोरोनाच्या संकटात यावेळी तुमचे कर्तव्य काय आहे. तुमच्यासाठी नैतिकतेची व्याख्या काय आहे? संकटाच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत या प्रकारे वागत आहात. टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले.