Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन 

मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन 

oxygen supply देशातील स्टील प्लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:33 AM2021-04-27T07:33:24+5:302021-04-27T07:41:11+5:30

oxygen supply देशातील स्टील प्लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत.

Tata Steel has increased its oxygen supply, which will now produce 600 tonnes of oxygen per day | मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन 

मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन 

Highlightsसध्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्यांकडून कोरोना संक्रमणाचा परिणाम झालेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) केला जात आहे. आता टाटा स्टीलने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी टाटा स्टील दररोजचा ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून 600 टन केला आहे. स्टील मंत्रालयाच्या सूचनेनुसार, देशातील स्टील प्लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. (Tata Steel has increased its oxygen supply, which will now produce 600 tonnes of oxygen per day)

'लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केंद्रासोबत काम करत आहोत'
टाटा स्टीलने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीने दररोज लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा 500-600 टनापर्यंत वाढविला. ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि राज्यांबरोबर काम करत आहोत. दरम्यान, गेल्या आठवड्यात टाटा स्टीलच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी दररोज विविध राज्यात 300 टन वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे, टाटाच नाही तर बर्‍याच स्टील प्लांट्सनी त्यांची उत्पादन क्षमता दुप्पट केली.

(राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती?)

उपलब्ध टँकर वैद्यकीय ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतरित
स्टील कंपन्यांनी राज्यांना ऑक्सिजन वेगाने पुरवण्यासाठी नायट्रोजन आणि एर्गोन टँकरना वैद्यकीय ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित केले. कंपन्यांनी 8345 मेट्रिक टन क्षमतेसह 765 नायट्रोजन आणि 7642 मेट्रिक टन क्षमतेसह 434 एर्गोन टँकर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे रूपांतर केले. पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थेने टँकर बदलण्यास परवानगी दिली. राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 15,900 मेट्रिक टन क्षमतेच्या 1,172 टँकरमध्ये आवश्यक बदल केले आहेत.

Web Title: Tata Steel has increased its oxygen supply, which will now produce 600 tonnes of oxygen per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.