देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलमधून ३८ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना मंदीच्या काळात कॉस्ट कटिंगच्या नावाखाली नव्हे, तर त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी, समूहाच्या दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधून चार बड्या अधिकाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या आल्या होत्या. ३८ पैकी तीन कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप आहेत.
टाटा सनचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी स्वतः टाटा स्टीलच्या वार्षिक शेअरहोल्डर्स मीटिंग दरम्यान ही माहिती दिली आहे. स्टील कंपनी टाटा स्टीलने गेल्या आर्थिक वर्षात गैरवर्तनाच्या आरोपाखाली ३८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही ३८ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, ज्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. यापैकी ३५ लोकांना नैतिक मुद्द्यांशी संबंधित अस्वीकार्य पद्धतींबद्दल काढून टाकण्यात आले आहे, तर ३ कर्मचाऱ्यांना लैंगिक गैरवर्तनाच्या गंभीर आरोपांमुळे काढून टाकण्यात आले आहे.
मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना बाजूला केलं असावं; काँग्रेस नेत्याचा दावा
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन पुढे म्हणाले की, कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचार्यांविरोधात एकापाठोपाठ एक अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर ही बाब कंपनीच्या निदर्शनास आली आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात आमच्याकडे ८७५ तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी १५८ व्हिसलब्लोअरशी संबंधित, ४८ सुरक्षेशी संबंधित आणि ६६९ एचआर आणि इतर वर्तणुकीशी संबंधित आहेत.
कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यांच्या अधिकारांचा गैरवापर, करार व्यवस्थापन करारांचे पालन न करणे आणि लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. टाटा अध्यक्षांनी बैठकीतील सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी गैरवर्तणुकीबद्दल बोलण्यास प्रोत्साहित केले.
जून २०२३ च्या शेवटच्या महिन्यात, टाटाच्या IT कंपनी TCS ने रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (RMG) मधील चार अधिकार्यांची हकालपट्टी केली आणि तीन स्टाफिंग फर्मवर बंदी घातली. मिंटच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, कामावरून काढलेले हे अधिकारी वर्षानुवर्षे नोकरीच्या बदल्यात उमेदवारांना स्टाफिंग फर्ममध्ये मिसळत होते.
अहवालानुसार, एका व्हिसलब्लोअरने कंपनीचे सीईओ आणि सीओओ यांना पत्र लिहून दावा केला की, आरएमजीचे जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती, कंपनीसाठी पात्र नसलेल्या उमेदवारांना कामावर घेण्यासाठी कर्मचारी कंपन्यांकडून किकबॅक घेत असल्याचा दावा केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
ही माहिती समोर आल्यानंतर TCS व्यवस्थापनात खळबळ उडाली आणि TCS ने घाईघाईने त्यांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. यामध्ये कंपनीचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचा समावेश होता. चौकशीनंतर, टीसीएसने आपल्या भर्ती प्रमुखांना रजेवर पाठवले आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले.
TCS चे नाव जगातील सर्वात जास्त कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये देखील समाविष्ट आहे. मार्च २०२३ च्या तिमाहीचे निकाल सादर करताना, कंपनीने म्हटले होते की, FY23 मध्ये २२,६०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या. ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६,१४,७९५ होती.