टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील नफ्याकडून तोट्याकडे वळली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत या कंपनीला 6,511.16 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर दुसरीकडे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 1,297.06 कोटी रुपयांचा नफा झाला होता.सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 55,910.16 कोटी रुपयांवर आलं, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 60,206.78 कोटी रुपये होतं. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 55,853.35 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत 57,684.09 कोटी रुपये होता. दरम्यान, बुधवारी टाटा स्टीलचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरून 116.15 रुपयांवर बंद झाले.काय म्हटलं कंपनीनं?टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली. टाटा स्टील इंडियानं सुमारे 5 दशलक्ष टन कच्च्या स्टील उत्पादनासह स्थिर कामगिरी केली. तिमाहीत अस्थिरता आणि हंगामी घटक असूनही, देशांतर्गत वितरणात वर्ष-दर-वर्षानुसार 6 टक्क्यांनी वाढ झाली. ऑटो आणि ब्रँडेड उत्पादनं आणि रिटेल यांची आतापर्यंतची सर्वोत्तम विक्री होती. यूकेमध्ये आम्ही सरकारी सहाय्यानं अत्याधुनिक स्क्रॅप-आधारित EAF मध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत आणि यामुळे एका दशकात थेट कार्बन उत्सर्जन ५० दशलक्ष टनांनी कमी होईल, असं ते म्हणाले.
नफ्यातून तोट्यात आली टाटांची ही कंपनी, झालं ६५११ कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 10:56 AM