Join us

टाटा स्टील-जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुपच्या कराराला टीएसएनचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:35 PM

टाटा स्टील आणि जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुप्प यांच्यात युरोपातील पोलाद उत्पादन ५० : ५० टक्के करण्याच्या नियोजित करारावर टाटा स्टीलच्या नेदरलँड्स शाखेच्या कामगारांच्या एका गटाने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : टाटा स्टील आणि जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुप्प यांच्यात युरोपातील पोलाद उत्पादन ५० : ५० टक्के करण्याच्या नियोजित करारावर टाटा स्टीलच्या नेदरलँड्स शाखेच्या कामगारांच्या एका गटाने चिंता व्यक्त केली आहे. टाटा स्टील नेदरलँड्सच्या (टीएसएन) सेंट्रल वर्क्स काउन्सिलने निवेदनात म्हटले आहे की, या सहमती करारांतर्गत टीएसएनच्या देखरेख करणा-या मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येईल व टीएसएनच्या संचालक मंडळाची स्थापना योग्यरीत्या होणार नाही.तथापि, टाटा स्टीलच्या युरोपीयन कारभाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅन्स फिशर यांनी मात्र सर्व संबंधितांशी सल्लामसलत केली जाईल, अशा शब्दांत कामगारांच्या काळजीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. कंपनीने अनेक वेळा बैठका घेतल्या असून, विधायक चर्चाही केल्या, असे ते म्हणाले. 

टॅग्स :टाटारतन टाटा