Join us

Tata Tech IPO Listing : लिस्टिंगनंतर प्रत्येक लॉटवर २१००० चा नफा, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:23 AM

टाटा समूहाचा बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीजचा आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला.

Tata Technologies IPO: टाटा समूहाचा बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies IPO) आज, गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी BSE आणि NSE वर लिस्ट झाला. अपेक्षेप्रमाणेच कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. टाटा समूहाचा हा शेअर बीएसईवर 1199.95 रुपयांवर म्हणजे 140 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स 140 टक्क्यांच्या प्रीमियमसह एनएसईवर 1,200 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर थोड्याच वेळात, हा शेअर बीएसईवर त्यांच्या इश्यू प्राईजपासून जवळपास 180 टक्क्यांनी वाढून 1398 रुपयांवर पोहोचला. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची इश्यू प्राईज 475-500 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मोठा नफा कमावला. 18 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS)  शेअर्स लिस्ट झाले होते.गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसादटाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिसऱ्या दिवशी IPO 69.4 पट सबस्क्राइब झाला. त्यात विक्रमी 73.6 लाख अर्ज आले होते. कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबरला उघडला आणि 24 नोव्हेंबरला बंद झाला. कंपनीने 3042 कोटी रुपये उभारण्यासाठी IPO लॉन्च केला होता.अधिक माहितीटाटा टेकचा आयपीओ हा संपूर्णपणे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांद्वारे 6.09 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे. ओएफएसमध्ये 60,850,278 शेअर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या प्रमोटर्सद्वारे 46,275,000 शेअर्सची विक्री, गुंतवणूकदार अल्फा टीसी होल्डिंग्सद्वारे 9,716,853 शेअर्सची विक्री आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडाद्वारे 4,858,425 इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे.

(टीप: यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार