Lokmat Money > बिझनेस न्यूज > तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स

तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २२ नोव्हेंबरपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 03:12 PM2023-11-22T15:12:32+5:302023-11-22T15:12:51+5:30

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २२ नोव्हेंबरपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे.

Tata Tech s IPO fully subscribed within an hour can apply till 24th see details price band gmp | तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स

तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स

Tata Tech IPO: टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २२ नोव्हेंबरपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. तब्बल एका तासामध्ये हा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झालाय. २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान या आयपीओसाठी अर्ज करता येईल.

टाटा समूहानं २० वर्षांनंतर आयपीओ लाँच केला आहे. टाटा टेकचा (Tata Tech) आयपीओ २२ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि त्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. हा संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत येईल. याचा अर्थ आयपीओमध्ये कोणताही नवीन इश्यू येणार नाही. तीन भागधारक आयपीओमधील त्यांचे काही शेअर्स विकतील. 

काय आहे प्राईज बँड
टाटा चेकच्या आयपीओसाठी ४७५-५०० रुपयांचा प्राईज बँड निश्चित करण्यात आलाय. गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी बोली लावावी लागेल. १ लॉटमध्ये ३० शेअर्स आहे. टाटा टेक या आयपीओद्वारे ३०४२.५१ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होतील. ग्रे मार्केट प्रीमिअमबद्दल सांगायचं झालं तर याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. याचा ग्रे मार्केट प्रीमिअम ३५५ रुपये आहे. या शेअरच्या एका लॉटसाठी तुम्हाला किमान १५००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. निरनिराळे लॉट मिळून तुम्ही एकूण २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

Web Title: Tata Tech s IPO fully subscribed within an hour can apply till 24th see details price band gmp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.