टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचा (TTML) शेअर रोजच्या रोज नवीन उच्चांक गाठत आहे. गेल्या 11 ट्रेडिंग दिवसांत, या शेअरला वारंवार अप्पर सर्किट लागत आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही याचा मोठा फायदा झाला आहे.
93 रुपयांवर होता शेअर -
या महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्च रोजी टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली होती. या शेअरची BSE वरील किंमत 93.55 रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र यानंतर हा स्टॉक ने रॉकेट स्पीड घेतली आहे. 8 मार्च ते 23 मार्च दरम्यान या शेअरच्या किमतीत 58 रुपयांनी वाढ झाली आहे.
सातत्याने अप्पर सर्किट -
गेल्या 5 दिवसांचा विचार करता, प्रत्येक ट्रेडिंग सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. 16 मार्च रोजी कंपनीचा शेअर 125.25 रुपयांवर होता. यानंतर 17 मार्चला 131.50 रुपये, 21 मार्चला 138.05 रुपये, 22 मार्चला 144.95 रुपये आणि 23 मार्चला 152.15 रुपयांवर बंद झाला.
वर्षभरात 1015 टक्के रिटर्न -
आपण टीटीएमएल स्टॉकच्या वर्षभरातील परताव्याचा विचार केल्यास, या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची बल्ले-बल्ले आहे. हा शेअर एका वर्षापूर्वी 24 मार्च 2021 रोजी BSE वर केवळ 13.65 रुपये होता. तर आता 23 मार्च 2022 रोजी तो 152.15 रुपयांवर बंद झाला. अर्थात, ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली, त्यांना वर्षभरात तब्बल 1,014.65 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.