Rakesh Jhunjhunwala portfolio: टायटन कंपनीचा (Titan Stock Price) शेअर हा शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांचा आवडता स्टॉक आहे. टाटा समुहाच्या या कंपनीमध्ये झुनझुनवाला दाम्पत्याचा एकूण 5.09 टक्के हिस्सा आहे. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत या शेअनं रॉकेट स्पीड पकडला आहे. टायटनचा शेअर एनएसईवर आपल्या ऑल टाईम हाय लेव्हल म्हणजेच 2,687.25 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. दरम्यान, काही तज्ज्ञ हा शेअर खरेदी करण्याचा अथवा होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत.
सध्या, NSE वर टायटनच्या शेअरची किंमत 2,556 रुपयांच्या जवळपास आहे आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही याबाबत उत्साही दिसून येत आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते राकेश झुनझुनवालांचा हा आवडचा स्टॉक वरच्या दिशेने आहे आणि दीर्घकाळात तो 3200 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो.
काय म्हणतायत तज्ज्ञ?"टायटन कंपनीने दागिने, सन-ग्लासेस आणि घड्याळ्यांच्या सेगमेंटमध्ये स्थिर वाढ दर्शविली आहे. कंपनीने परफ्यूम व्यवसायात उल्लेखनीय एन्ट्री केली आहे. कंपनीनं नवी स्मार्ट वॉचेस लाँच केली असून ती लोकांच्याही पसंतीस उतरत आहेत. याशिवाय स्टॉकला सोनच्या किंमतीतील वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे हा स्टॉक पुढील काळातही चांगली कामगिरी करू शकेल. दीर्घ कालावधीसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक ठेवला पाहिजे," असा सल्ला जीसीएल सिक्युरिटीजचे व्हाईस चेअरमन रवी सिंघल यांनी दिली. टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.