Join us

नोएल टाटा येताच टाटा समूहात महत्त्वाची परंपरा खंडीत! ट्रस्टने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:37 AM

Tata Trusts : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात मोठी परंपरा खंडीत झाली आहे. नुतकत्याच झालेल्या संचालक मंडाळांच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tata Trusts : टाटा समूह देशातील सर्वात जुन्या उद्योगपती घराण्यांपैकी एक आहे. या समूहाच्या स्वतःच्या अनेक परंपरा आहेत. यामध्ये आता पहिल्यांदाच खंड पडला आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टने नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त स्थायी सदस्य बनले आहेत. या बदलामुळे निश्चित मुदतीच्या नियुक्त्यांची व्यवस्था संपुष्टात आली आहे. गुरुवारी झालेल्या दोन्ही ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या घडामोडीनंतर मंडळाचे सदस्य स्वतःहून राजीनामा देत नाही तोपर्यंत निवृत्त होणार नाहीत. ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या संमतीनंतरच नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

बिझनेस डेलीनुसार, दोन्ही ट्रस्टकडे टाटा सन्सचे अर्ध्याहून अधिक शेअर्स आहेत, जी सुमार १६५ अब्ज डॉलर्सची होल्डिंग कंपनी आहे. यामध्ये टाटा समूहाच्या अनेक नामांकित कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट समूहाच्या सर्व परोपकारी उपक्रमांचे व्यवस्थापन करते.

दोन्ही ट्रस्टकडे टाटा सन्सचे किती शेअर्स?अहवालानुसार, सर रतन टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सचे २७.९८ टक्के शेअर्स आहेत, तर सर दोराबजी टाटा यांच्याकडे होल्डिंग फर्मचे २३.५६ टक्के शेअर्स आहेत. नोएल टाटा यांची ११ ऑक्टोबर रोजी टाटा ट्रस्टच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर ट्रस्टने आयोजित केलेली ही दुसरी बोर्ड बैठक होती. कॉर्पोरेट आयकॉन रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.

टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्स हॉटेल, ऑटोमोबाईल, ग्राहक उत्पादने आणि एअरलाइन्ससह विविध क्षेत्रातील ३० कंपन्यांची देखरेख करते. गेल्या काही वर्षांमध्ये, टाटा सन्स जग्वार लँड रोव्हर आणि टेटली टी सारख्या ब्रँड्सच्या संपादनासह एक जागतिक व्यवसाय समूह बनला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ताज हॉटेल्स आणि एअर इंडियाचे मालक असून देशात स्टारबक्स SBUX.O आणि एअरबस व्यवसायात भागीदार आहेत. 

टॅग्स :टाटारतन टाटानोएल टाटा