Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात

टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात

या करारामुळे आणखी रोजगार आणि व्यावसायिक संधींची निर्मिती होईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:54 AM2022-05-31T10:54:35+5:302022-05-31T10:55:01+5:30

या करारामुळे आणखी रोजगार आणि व्यावसायिक संधींची निर्मिती होईल. 

Tata vehicles to be built at Ford Company, Sanand project in possession | टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात

टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात

नवी दिल्ली : फोर्ड इंडिया प्रा. लि.च्या (एफआयपीएल) सानंदमधील वाहन उत्पादन प्रकल्पाचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीईएमएल) सरसावली असून, त्यासाठी टीपीईएमएल व एफआयपीएल यांनी गुजरात सरकारशी करार केला आहे. टीपीईएमएलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, टाटा मोटर्सची गुजरातेतील उपस्थिती एका दशकापेक्षाही अधिक काळापासून आहे. या करारामुळे आणखी रोजगार आणि व्यावसायिक संधींची निर्मिती होईल.

गुंतवणूक वाढणार

गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीवकुमार गुप्ता यांनी सांगितले की, हा करार सर्व हितधारकांसाठी लाभदायक आहे. यातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास मजबूत होईल तसेच देशातील आघाडीचे गुंतवणूक स्थान म्हणून गुजरातची स्थिती मजबूत होईल. 

काय मिळणार टाटांना...

प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार असून, वर्षाला ४ लाखांपेक्षा जास्त वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात इलेक्ट्रिक वाहने उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भूमी, इमारती, वाहन निर्मिती, आस्थापना, यंत्रे व उपकरणे, कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण होणार आहे. 
 

Web Title: Tata vehicles to be built at Ford Company, Sanand project in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.