Join us  

TATA ची एक डील रिलायन्सचा 'विजयी रथ' रोखणार...! सर्वसामान्यांना 'मोठ्ठा' फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:28 AM

Ratan Tata vs Mukesh Ambani: एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत.

खासगी क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि रिलायन्स यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोन्ही कंपन्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे ग्राहक आता सरकारी कंपनी असलेल्या BSNL कडे वळताना दिसत आहेत. एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत.

यातच, एक आनंदाची बातमी आली आहे. टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा एक नवा करार झाला आहे. हे दोघेही संपूर्ण भारतातील 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा विचार करत आहेत.

जिओ-एअरटेल 4जीचे 'किंग'सध्या, 4G इंटरनेट सर्व्हिसच्या जगात Jio आणि Airtel किंग आहेत. मात्र BSNL ने आपली स्थिती मजबूत केली, तर ते Jio आणि Airtel ला मोठे आव्हान देऊ शकतात. याच बरोबर, टाटाही भारतातील चार वेगवेगळ्या भागात डाटा सेंटर तयार करत आहे. यामुळे देशात 4G इंफ्रास्ट्रक्चरचा बळकटी मिळेल.

बढ़ाईं रिचार्ज प्लान्स की कीमतेंगेल्या महिन्यात Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या. यानंतर Airtel आणि VI (Vodafone Idea) नेही असाच निर्णय घेतला. Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 12% ते 25% टक्क्यांपर्यंत वाढ केली. Airtel ने 11% ते 21% आणि VI (Vodafone Idea) नेही 10% ते 21% पर्यंत वाढ केली आहे. मात्र, सोशल मीडियावर सर्वाधिक राग Jio वर काढला जात आहे आणि बरेचसे युजर्स BSNL कडे वळताना दिसत आहेत.

टॅग्स :टाटाबीएसएनएलरिलायन्सएअरटेलजिओ