Lokmat Money > बिझनेस न्यूज > TaTa in Beauty, Cosmetics Business: 23 वर्षांपूर्वी हा उद्योग सोडलेला, पण महिलेची भरारी पाहून रतन टाटा चक्रावले; पुन्हा सुरु करणार

TaTa in Beauty, Cosmetics Business: 23 वर्षांपूर्वी हा उद्योग सोडलेला, पण महिलेची भरारी पाहून रतन टाटा चक्रावले; पुन्हा सुरु करणार

Ratan Tata will start old but new Business: टाटा कंपनी कोणत्या उद्योगात नाहीय अशी नाही. मीठ, चहा पावडरपासून ते अगदी आता विमाने बनविण्यापर्यंत टाटाने मजल मारलेली आहे. असाच एक उद्योग होता, जो 1998 मध्ये विकलेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:20 PM2021-12-16T21:20:16+5:302021-12-16T21:21:03+5:30

Ratan Tata will start old but new Business: टाटा कंपनी कोणत्या उद्योगात नाहीय अशी नाही. मीठ, चहा पावडरपासून ते अगदी आता विमाने बनविण्यापर्यंत टाटाने मजल मारलेली आहे. असाच एक उद्योग होता, जो 1998 मध्ये विकलेला.

TaTa will be in Beauty, Cosmetics Business: Leaving the industry 23 years ago, Ratan Tata went crazy on nykaa | TaTa in Beauty, Cosmetics Business: 23 वर्षांपूर्वी हा उद्योग सोडलेला, पण महिलेची भरारी पाहून रतन टाटा चक्रावले; पुन्हा सुरु करणार

TaTa in Beauty, Cosmetics Business: 23 वर्षांपूर्वी हा उद्योग सोडलेला, पण महिलेची भरारी पाहून रतन टाटा चक्रावले; पुन्हा सुरु करणार

टाटा कंपनी कोणत्या उद्योगात नाहीय अशी नाही. मीठ, चहा पावडरपासून ते अगदी आता विमाने बनविण्यापर्यंत टाटाने मजल मारलेली आहे. टाटांच्या बहुतांश कंपन्या आज एवढ्या फॉर्मात आहे की, जगभरात नावाजलेल्या आहेत. परंतू, आज रतन टाटांना एक खंत वाटू लागली आहे. रतन टाटांनी एक उद्योग 23 वर्षांपूर्वी बंद केला होता, आज एका महिलेने त्यांना या उद्योगात भरारी घेत नवे क्षितीज दाखवून दिले आहे. 

ब्युटी प्रॉडक्टचा हा उद्योग आहे. देशातील कॉस्मेटिक्सचा हा बाजार 2025 पर्यंत जवळपास 20 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. 2017 मध्ये ते 11 अब्ज डॉलर्स एवढे होते. मुंबईच्या एका महिलेने या उद्योगात पाऊल ठेवले आणि बघता बघता ही स्टार्टअप कंपनीचा आयपीओ आला आणि 13 अब्ज डॉलर्सची ही कंपनी बनली. नायकाला कोरोनाकाळात मोठी मागणी होती. ही कंपनी स्वत:च्या उत्पादनांसह मोठमोठ्या ब्रँड्सची उत्पादने ऑनलाईन विकते. या कंपनीला लाखो ग्राहकांसह सोशल मीडियाचाही मोठा आधार मिळाला.

कॉस्मेटिक्समध्ये भारताची सर्वात पहिली कंपनी ही 1953 मध्ये स्थापन झाली होती. या कंपनीचे नाव होते लॅक्मे. नोएल टाटांची आई सिमोन टाटा यांनी देवी लक्ष्मीचे फ्रेंचमधील नाव ठेवत ही कंपनी स्थापन केली होती. मात्र, 1998 मध्ये टाटा ग्रुपने युनिलिव्हरला ती कंपनी विकली. ब्युटी, फुटवेअर आणि अंडरवेअर कॅटेगरीतून ट्रेंटला 100 दशलक्ष डॉलरचा व्यवसाय होतो. यामुळे टाटा आता हा व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहे. 

नोएल टाटा ट्रेंटचा हा उद्योग गेल्या दोन दशकांपासून सांभाळत आहेत. तसेच ते टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळावर देखील आहेत. यामुळे ते ब्युटी, कॉस्मेटिक्समध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहेत. रतन टाटा देखील या जुन्या परंतू नव्याने सुरु होणाऱ्या उद्योगाबाबत उत्सुक आहेत. ट्रेंट हे टाटा क्लिक आणि वेस्टसाईडद्वारे व्यवसाय करते. परंतू त्यांना अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या आक्रमक डिस्काऊंट देण्याच्या नितीचा तोटा होत आहे. 

Web Title: TaTa will be in Beauty, Cosmetics Business: Leaving the industry 23 years ago, Ratan Tata went crazy on nykaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.