Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA ग्रुप iPhone ची निर्मिती करणार; भारतासह जगभरात निर्यात होणार

TATA ग्रुप iPhone ची निर्मिती करणार; भारतासह जगभरात निर्यात होणार

Tata Wistron Takeover: आयफोनच्या निर्मितीसाठी टाटा ग्रुपने एक मोठ्या कंपनीचे अधिगृहण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 07:11 PM2023-10-27T19:11:09+5:302023-10-27T19:12:36+5:30

Tata Wistron Takeover: आयफोनच्या निर्मितीसाठी टाटा ग्रुपने एक मोठ्या कंपनीचे अधिगृहण केले आहे.

Tata Wistron Takeover: TATA Group to manufacture iPhone, export worldwide including India | TATA ग्रुप iPhone ची निर्मिती करणार; भारतासह जगभरात निर्यात होणार

TATA ग्रुप iPhone ची निर्मिती करणार; भारतासह जगभरात निर्यात होणार

Tata Wistron Takeover: TATA ग्रुप लवकरच Apple iPhone चे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी हे उत्पादन सुरू करेल. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी जगभरात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जायचे. आता भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे. राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया X द्वारे ही माहिती दिली. 

टाटा ग्रुपने भारतात iPhone च्या नवीन मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले आहे. नुकताच लॉन्च झालेला iPhone 15 देखील भारतातच तयार केला गेला आहे. टाटाने भारतात आयफोन निर्मितीसाठी तैवानची कंपनी विस्ट्रॉन कॉर्प विकत घेतली आहे. विस्ट्रॉन कॉर्प अॅपलची सप्लायर कंपनी आहे. कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून टाटा समूहाने केलेल्या अधिग्रहणाची माहिती दिली.

कंपनीने सांगितले की, त्यांनी आज संचालक मंडळाची बैठक घेतली आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी यासाठी मान्यताही दिली आहे. या अंतर्गत, एसएमएस इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि विस्ट्रॉन हाँगकाँग लिमिटेड यांना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टाटासाठी आयफोन उत्पादन महत्वाचे
भारतात फक्त फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन आयफोन बनवतात. म्हणजेच आयफोन भारतात तयार होतो, पण स्थानिक कंपनी त्याची निर्मिती करत नाही. आयफोन निर्मितीची जबाबदारी भारतीय कंपनीच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, Apple अजूनही भारतात सर्व मॉडेल्स असेंबल करत नाही. कंपनीने यावर्षीच्या iPhone 15 चे उत्पादन भारतात सुरू केले आहे, परंतु iPhone 15 Pro सीरिज अजूनही चीनमध्ये तयार केली जाते. सध्या अॅपलच्या एकूण उत्पादनांपैकी 7 टक्के उत्पादने भारतात तयार होतात. चीन अजूनही अॅपलचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.

Web Title: Tata Wistron Takeover: TATA Group to manufacture iPhone, export worldwide including India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.