मुंबई - केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी टाटा समूहाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक लष्करी वाहनांच्या निर्मितीसाठी टाटा मोटर्समधून संरक्षण सामग्री विभाग वेगळा करण्यात आला आहे. जवळपास ७९ हजार कर्मचारी असलेल्या टाटा मोटर्सद्वारे संरक्षण वाहनांचीही निर्मिती होते. त्यामध्ये प्रामुख्याने लष्कराला लागणाऱ्या ट्रक व अन्य वाहनांचा समावेश आहे. लष्कराला लागणाºया विविध सामग्री निर्मितीसाठी टाटा समूह केंद्र सरकारचा धोरणात्मक भागीदार झाला आहे. त्यासाठी टाटा अॅडव्हान्सड् सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. टाटा मोटर्समधील संरक्षण सामग्री विभाग या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याखेरीज टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेड ही टाटा मोटर्सची उप कंपनी असून हवाई क्षेत्रातील सामग्रींची निर्मिती कंपनी करते. टाटा मोटर्सने या उपकंपनीची टीएएसएलला ६२५ कोटी रुपयांना विक्री केली आहे. यातूनच आता टाटा समूह लष्करी सामग्री व हवाई दलासाठी लागणाºया विविध सामग्री उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार हे स्पष्ट आहे.
अत्याधुनिक संरक्षण सामग्री उत्पादनासाठी टाटांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 1:28 AM