मुंबई - टाटा समुहाची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्शोरन्स कंपनीने (Tata AIA Life Insurance) आपल्या डिस्ट्रिब्युशन सुविधा देशभरात पोहोचवण्यासाठी १०० नव्या डिजिटल ब्रँच लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. सध्या कंपनीच्या देशामधील २५ राज्यांमधील १७५ शहरांमध्ये १२८ पासून अधिक शाखा आहेत. कंपनीने एजन्सी, ब्रोकिंग, बँक इन्शोरन्स, असिस्टेड खरेदी आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये मजबूत पकड बनवली होती. नव्या ब्रँचच्या माध्यमातून कंपनी देशातील १८ हून अधिक शहरांमध्ये आपली सेवा देत आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश आहे.
टाटा एआयएच्या १०० नव्या डिजिटल ब्रँचमध्ये ६० हून अधिक शाखांमध्ये कामकाज सुरू झाले आहे. उर्वरित सर्व ब्रँचमध्ये नोव्हेंबरच्या अखेरीपासून काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने देशामध्ये जीवन विम्याला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या ब्रँच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, या विस्तारामुळे विमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. या सर्व ब्रँचमध्ये डिजिटल पद्धतीने कामकाज करता येईल. यामध्ये ग्राहक व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी बोलता येणार आहे.
जर ग्राहकांनी डिजिटल ब्रँच व्हिजीट केली तर सेल्फ सर्व्हिस डिजिटल कियोस्कच्या माध्यमातून आपली सर्व कामे आटोपता येतील. अशा डिजिटल ब्रँचच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेही शक्य होणार आहे.
टाटा एयआयएचे मुख्य एजन्सी अधिकारी अमित दवे यांनी सांगितले की, नव्या १००मधून ७० डिजिटल ब्रँच त्या ठिकाणी सुरू करता येतील जिथे सध्या आमची एजन्सी नाही. त्यामुळे आमच्या सेवेचा विस्तार होईल आणि स्थानिक लोकांनाही फायदा मिळेल. या विस्तारामध्ये १० हजारांहून अधिक लोकांना नोकरी मिळेल. कंपनीचे नवे कर्मचारी विमा सल्लागार म्हणून काम करू शकतील.