Join us

27Seven Godfrey Phillips : टाटा, अंबानी, दमानी; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:47 PM

या दिग्गज कंपनीची टाटा समूहाची कंपनी टाटा ट्रेंट, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि राधाकिशन दमानींच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स यांच्याशी चर्चा सुरू आहे.

गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) त्यांची रिटेल ग्रोसरी चेन २४ सेव्हनचा (24Seven) व्यवसाय विकणार आहे. यासाठी टाटा समूहाची कंपनी टाटा ट्रेंट, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि राधाकिशन दमानींच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स यांच्याशी चर्चा सुरू आहे. चर्चेचा अंतिम निर्णय व्हॅल्युएशनवर अवलंबून असेल, असं द इकॉनॉमिक टाईम्सच्या (ईटी) रिपोर्टमध्ये म्हटलंय. १२ एप्रिल रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, गॉडफ्रे फिलिप्स इंडियानं त्यांचा रिटेल व्यवसाय 24Seven विकण्याची योजना उघड केली. रिटेल बिझनेस डिव्हिजनच्या समीक्षेनंतर तोट्यात चालणारा हा व्यवसाय विकण्याची ओजना आखण्यात आलीये. 

२००५ मध्ये सुरूवात 

२००५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे दिल्ली-एनसीआर (NCR), पंजाब आणि हैदराबाद येथे १४५ स्टोअर्स कार्यरत आहेत. हे ग्रोसरी, स्टेपल्स, स्नॅक्स, पेये, मोदी समूहाच्या कलरबार ब्युटी ब्रँडची उत्पादनं आणि पर्सनल केअर प्रोडक्टची विक्री करते. कंपनी काही मोठ्या आऊटलेट्समध्ये रेडी टू इट फूड्स देखील विकते. कंपनीचे सध्याचे नुकसान असूनही 24Seven मॉडेलचा विस्तार ग्रोसरी, स्टेपल्स, सामान्य प्रोडक्ट्स आणि अगदी लहान इन-स्टोअर कॅफे समाविष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो, असंही ईटीच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. 

अनेक दिग्गज रेसमध्ये 

टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेड ही ग्रोसरी चेन स्टार बाजार चालवते. याच्या विस्तारात २४ सेव्हन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सबद्दल बोलायचे तर, टेक्सासची कंपनी 7-Eleven ब्रँडसोबत त्यांची भागीदारी आहे. ही कंपनी २०२१ मध्ये सुरू झाली आणि सुमारे ५० स्टोअर्स चालवते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर रिलायन्स आणि २४ सेव्हनचं अधिग्रहण केलं तर कनव्हिनिअंट स्टोअर चेन त्यात विलीन होऊ शकते. उद्योगजक राधाकिशन दमानी यांची डीमार्ट चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सची देखील २४ सेव्हनकडे नजर आहे.

टॅग्स :व्यवसायटाटामुकेश अंबानीरिलायन्स