Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायरस मिस्त्रींना हटवल्याने टाटाचे शेअर्स गडगडले

सायरस मिस्त्रींना हटवल्याने टाटाचे शेअर्स गडगडले

१00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने उद्योग जगतात खळबळ उडाली असताना याचा परिणाम सेन्सेक्सवरदेखील पाहायला मिळाला

By admin | Published: October 25, 2016 10:14 AM2016-10-25T10:14:28+5:302016-10-25T13:00:32+5:30

१00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने उद्योग जगतात खळबळ उडाली असताना याचा परिणाम सेन्सेक्सवरदेखील पाहायला मिळाला

Tata's shares collapsed due to deletion of Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींना हटवल्याने टाटाचे शेअर्स गडगडले

सायरस मिस्त्रींना हटवल्याने टाटाचे शेअर्स गडगडले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - १00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने उद्योग जगतात खळबळ उडाली असताना याचा परिणाम सेन्सेक्सवरदेखील पाहायला मिळाला. मंगळवारी सकाळी शेअर बाजार उघडताच टाटा समुहातील कंपन्यांचे शेअर्स 3 ते 5 टक्क्यांनी घसरले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन, बेवरेजच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सायरस मिस्त्रींना हटवल्यानंतर अनिश्चिततेचे वातावरण असल्याचं दिसत आहे. 
 
मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही महिन्यांपूर्वी दिली गेली त्या टाटा समूहाच्या अध्यक्षास सोमवारी अचानक समूहानेच ‘टाटा’ केला. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली. नव्या चेअरमनची निवड करण्यासाठी रतन टाटा यांच्यासह ५ जणांची सर्च टीम तयार करण्यात आली असून, नवा चेअरमन मिळेपर्यंत चार वर्षांनी पुन्हा एकदा रतन टाटा यांनी समूहाची धुरा आपल्या हाती घेतली.
 
 
४८ वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी ७८ वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मिस्त्री यांना पदावरून तातडीने काढण्यामागील कारण जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, मिस्त्री यांच्या कामावर ‘टाटा सन्स’ समाधानी नव्हती. नफ्यात नसलेल्या उद्योगांकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे समजते. मिस्त्री यांना पदमुक्त केल्याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले. 
 
04/07/1968 रोजी जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज आॅफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, असे बोलले जात आहे. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.
 
2006 मध्ये त्यांनी टाटाच्या संचालक मंडळात प्रवेश मिळविला होता. मिस्त्री यांना टाटामधील सर्वाधिक समभाग असलेल्या शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून चेअरमन करण्यात आले होते.
 

Web Title: Tata's shares collapsed due to deletion of Cyrus Mistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.