Join us

इलॉन मस्कच्या मदतीने अवकाशात जाणार TATA चा ‘गुप्तहेर’, चीन-पाकिस्तानवर ठेवणार पाळत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 1:55 PM

टाटाने भारतीय सुरक्षा दलांसाठी एक खास गुप्तहेर तयार केला आहे. एप्रिलपर्यंत याचे काम सुरू होईल.

Tata Tesla: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने एक 'गुप्तहेर' तयार केला आहे. हा गुप्तहेर इलॉन मस्क यांच्या मदतीने आकाशात जाईल आणि तेथून चीन-पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवेल. वास्तविक हा गुप्तचर एक सॅटेलाईट आहे, ज्याला मिलिट्री ग्रेड अंतर्गत ठेवण्यात आले आहे. स्पेसएक्स कंपनी रॉकेटच्या मदतीने हा अमेरिकेतून आकाशात पाठवला जाणार आहे. तर, भारतात या उपग्रहाचे ग्राउंड स्टेशन उभारले जाईल.

एप्रिलमध्ये होणार लॉन्चमीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Advanced Systems (TASL) ने तयार केलेले सॅटेलाईट गेल्या आठवड्यात पूर्ण झाला आणि एप्रिलपर्यंत प्रक्षेपणासाठी फ्लोरिडाला पाठवला जात आहे. TASL कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सॅटेलाईटचे नियंत्रण भारतात राहील. यामुळे सशस्त्र दलांना गुप्तपणे पाळत ठेवता येईल. यापूर्वी देखरेखीसाठी अचूक कॉर्डिनेट्स आणि टाईम परदेशी व्हेंडर्सना सांगावे लागत होते. 

विशेष म्हणजे, हे सॅटेलाईट सुरू होईपर्यंत बंगळुरुमध्ये यासाठी एक प्रगत ग्राउंड कंट्रोल सेंटर तयार असेल. नियंत्रण केंद्र सॅटेलाईटचा मार्ग आणि प्रक्रियेला निर्देशित करेल, ज्याचा उपयोग सशस्त्र दलांना पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि इतर मिशनसाठी होईल. या सॅटेलाईटमुळे आपल्या सुरक्षा दलांना मोठी मदत होणार आहे.

टॅग्स :टाटाटेस्लाएलन रीव्ह मस्करतन टाटानासाइस्रो