कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बर्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. पण अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील 40 हजार फ्रेशर्सना नोकर्या देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीही कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटातही टीसीएसनं भरती काढल्यानं ती महत्त्वाची आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.
अमेरिकेतही नोकऱ्यांची दुप्पट संधी
एवढेच नव्हे, तर टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, “मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करीत आहोत. कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते थांबविण्यात आले होते, परंतु आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत.
TCSचा नफा आला खाली
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत 13 टक्क्यांनी घसरून अवघ्या 7,049 कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोनाच्या संकटामुळे झालेले नुकसान आहे.
कॅम्पस हायरिंगमध्ये मोठी घट
Firstnaukri.comच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना विषाणूमुळे यावर्षी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस हायरिंग 82 टक्क्यांनी घटली आहे. इतकेच नव्हे, तर प्री-फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये 74 टक्क्यांनी घट झाली आहे. सर्वेक्षणानुसार नोकरीच्या 44 टक्के ऑफरची जॉयनिंग डेट पुढे ढकलण्यात आली आहे, तर केवळ ९ टक्के ऑफरच मागे घेण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सामील झालेल्या जवळपास 33 टक्के कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ अधिकारी त्यांना नोकरीच्या स्थितीविषयी कोणतीही माहिती देत नाही.
हेही वाचा
हिमाचलच्या पर्वतांमधून 'या' राज्यांत येतंय मोठं संकट, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा
अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी
बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन
रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख
टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर