Join us  

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई! टाटांच्या कंपनीचे बाजारमुल्य रिलायन्सच्या नजीक येऊन ठेपले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 4:45 PM

Tata vs Reliance: The battle has begun! आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या साम्राज्याला हा धक्का आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे सध्याचे बाजारमुल्य 13.53 लाख कोटी रुपये आहे.

देशातील सर्वाती मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) शुक्रवारी बीएसईवर 4 टक्क्यांची वाढ नोंदविली. यामुळे टीसीएसचा शेअर ऑल टाईम हाय 3,479.35 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी या शेअरने 25 जूनला 3399 रुपयांची उंची गाठली होती. यामुळे टीसीएसचे बाजारमुल्य देखील 13 लाख कोटींच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. (TCS Share hits record High; Market cap reach at 13-trillion mark)

उद्योगविश्वातील मोठी घडामोड! Godrej Industries च्या अध्यक्षपदावरून आदी गोदरेज पायउतार

आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या साम्राज्याला हा धक्का आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे सध्याचे बाजारमुल्य 13.53 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स सध्या देशातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी आहे. टीसीएसचे बाजारमुल्य आज 12.87 लाख कोटींवर पोहोचले आहे. टीसीएसने शुक्रवारी सांगितले की, सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला Microsoft Business Applications 2021/2022 Inner Circle साठी निवडण्यात आले आहे. 

Scrappage Policy benefits: स्क्रॅपिंग पॉलिसीचे फायदेच फायदे; जाणून घ्या वाहन मालकांना काय मिळणार...

एचडीएफसी सिक्योरिटीजने टीसीएसच्या शेअरसाठी 3650 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवत अॅड रेटिंग तसेच ठेवले आहे. नजीकच्या काळात कंपनी चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे, असे एचडीएफसीने म्हटले आहे. Antique Stock Broking च्या तज्ज्ञाने सांगितले की, टीसीएस ब्रँड, अधिक काळासाठी गुंतवणूक करण्याची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांची सोडून जाण्याचा दर कमी असल्याने येत्या तिमाहींमध्ये चांगले काम करण्याची अपेक्षा आहे. टीसीएसचा शेअर शुक्रवारी म्हणजेच आज 3.15 टक्क्यांच्या वाढीने 3459.50 रुपयांवर बंद झाला. 

टॅग्स :टाटारिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार