Lokmat Money > बिझनेस न्यूज > भूषण स्टीलसाठी टाटाची निविदा अखेर मंजूर

भूषण स्टीलसाठी टाटाची निविदा अखेर मंजूर

कर्जबाजारी भूषण स्टीलमधील १२.२७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी टाटा स्टीलने दाखल केलेल्या निविदेला विरोध करणाऱ्या सर्व याचिका राष्ट्रीय कंपनी लवादाने फेटाळून लावल्या असून, टाटा स्टीलच्या निविदेला मंजुरी दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:02 AM2018-05-16T00:02:41+5:302018-05-16T00:02:41+5:30

कर्जबाजारी भूषण स्टीलमधील १२.२७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी टाटा स्टीलने दाखल केलेल्या निविदेला विरोध करणाऱ्या सर्व याचिका राष्ट्रीय कंपनी लवादाने फेटाळून लावल्या असून, टाटा स्टीलच्या निविदेला मंजुरी दिली आहे.

Tata's tender for Bhushan Steel is finally approved | भूषण स्टीलसाठी टाटाची निविदा अखेर मंजूर

भूषण स्टीलसाठी टाटाची निविदा अखेर मंजूर

नवी दिल्ली : कर्जबाजारी भूषण स्टीलमधील १२.२७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी टाटा स्टीलने दाखल केलेल्या निविदेला विरोध करणाऱ्या सर्व याचिका राष्ट्रीय कंपनी लवादाने फेटाळून लावल्या असून, टाटा स्टीलच्या निविदेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूषण स्टीलचे कर्मचारी, परिचालन कर्जदाता कंपनी एल अँड टी यांच्या याचिका लवादाने फेटाळल्या. नादारी व दिवाळखोरी संहितेच्या कलम २९ (अ) नुसार टाटा स्टील निविदा भरण्यास पात्रच नाही, असा दावा भूषण स्टीलच्या कर्मचाºयांनी याचिकेत केला होता, तर कर्जफेडीत आपल्याला प्राधान्य द्यावे, असे एल अँड टीचे म्हणणे होते.
लवादाने ११ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. भूषण स्टीलमधील १२.२७ टक्के हिस्सेदारीसाठी ३२,५00 कोटींचा प्रस्ताव टाटा स्टीलने दिला होता. त्याला कर्जदाता समितीने (सीओसी) मंजुरीही दिली होती.
>प्रत्येकी लाखाचा दंड
लवादाने दोन्ही याचिका फेटाळतानाच याचिकाकर्त्यांना प्रत्येकी १ लाखाचा दंड ठोठावला, तसेच भूषण एनर्जीची याचिकाही फेटाळली आहे. भूषण स्टीलसोबतचा वीजखरेदी करार पुढेही सुरू ठेवण्याची मागणी भूषण एनर्जीने केली होती.

Web Title: Tata's tender for Bhushan Steel is finally approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.