Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

कंपनी आपल्या व्यवसायाचा कायापालट करण्याची करतेय पूर्ण तयार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:52 AM2022-06-02T11:52:12+5:302022-06-02T11:52:49+5:30

कंपनी आपल्या व्यवसायाचा कायापालट करण्याची करतेय पूर्ण तयार.

tatas to turn air india into a lean mean flying machine company offers vrs scheme for permanent staff and starting fresh hiring first time for cabin crew | Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

एअर इंडियाची (Air India) सूत्रं आपल्या हाती घेतल्यानंतर आता टाटांनी (Tata) पुन्हा नवसंजीवनी देण्याची तयारी केली आहे. एअर इंडियाला अधिक चांगले बनवण्यासाठी नवीन कार्यकारी टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पुनर्प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केले जात आहेत. कंपनीने VRS (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) योजना (Air India VRS) देखील सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्कीमचा लाभ केबिन क्रू ला देखील घेता येणार आहे.

कंपनीनं बुधवारपासून व्हीआरएस स्कीम सुरू केली असून, त्याअंतर्गत जुलै अखेरपर्यंत कोणीही निवृत्त झाल्यास त्याला विशेष सवलती मिळतील. आतापर्यंत, एअर इंडियामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करण्यासाठी पायलट आणि केबिन क्रू वेगवेगळे होते. अशा परिस्थितीत, कंपनीने एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत सर्व क्रू मेंबर्सना असे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांमध्ये सहजपणे काम करू शकतील.

विमानांचीही गुणवत्ता सुधारतेय
नवीन बोईंग विमानांसाठी वाटाघाटी सुरू आहेत, तर जुन्या विमानांची किंमत आणि गुणवत्ता या दोन्हीची काळजी घेण्यासाठी अपग्रेड केले जात आहे. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, जी विमाने गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत, ती सेवेतून बाहेर काढली जात आहेत. एवढेच नाही तर पायलट आणि क्रू मेंबर्सचे मॅन्युअल रोस्टरिंगही बंद करण्यात आले आहे. त्याच्या जागी इलेक्ट्रीक रोस्टिंग सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गडबड होण्याची शक्यता नाही.

मनमानीवर लगाम
नवीन प्रणालीमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सचे कामाचे तासही निश्चित केले जात आहेत. सध्याच्या व्यवस्थेत काही क्रू मेंबर्स ९० तास उड्डाण करताना दिसतात, तर अनेक फक्त २० तास उड्डाण करत आहेत. अशा स्थितीत आता दोघांमधील फरक मिटवून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाही तर पायलटला आता त्याच्या अधिकृत बेसवरून ड्युटीवर रिपोर्ट करावा लागणार आहे. आत्तापर्यंतच्या व्यवस्थेत तो त्याच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणाहून विमान प्रवास करायचा आणि तिथे जाण्यासाठी प्रवास खर्च आणि हॉटेलच्या राहण्याच्या खर्चाचे बिल कंपनीच्या नावाने दिले जायचे.

इतिहासात पहिल्यांदाच केबिन क्रूसाठी व्हीआरएस
एअर इंडियाच्या नव्या व्यवस्थेमुळे काही कर्मचारीही नाराज झाले आहेत, ज्यांनी त्यांच्याशी न बोलता हे बदल केल्याची तक्रार आहे. मात्र, सध्या कंपनीची धुरा टाटांकडे असून कंपनी त्यांच्या सर्व मुद्द्यांवर विचार करेल अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. कंपनी आपल्या व्यवसायाचा कायापालट करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. विमान कंपन्यांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की केबिन क्रूसाठी व्हीआरएस योजना सुरू करण्यात आली आहे. व्हीआरएससाठी वयही ५५ वर्षांवरून केवळ ४० वर्षे करण्यात आले आहे.

Web Title: tatas to turn air india into a lean mean flying machine company offers vrs scheme for permanent staff and starting fresh hiring first time for cabin crew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.