मुंबई : मुंबई महानगरात अशा ४७ हजार संस्था, प्रतिष्ठाने आहेत की, जे केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) भरत नाहीत. मुंबई विभागातील या संस्था सध्या कर चोरी विरोधी विभागाच्या रडारवर आहेत.सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनप्रीत अरोरा म्हणाले की, नव्या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर या विभागाने सात महिन्यांचा कालावधी दिला होता. आता आम्ही करचोरीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २ कोटींपेक्षा अधिक करचोरी प्रकरणात अटक करण्याची तरतूद आहे किंवा तसे अधिकार संबंधितांना आहेत. प्रकरण ५ कोटींपेक्षा अधिक असेल तर हा गुन्हा अजामीनपात्र असेल व दंडाधिकारी न्यायालयाकडूनच जामीन मिळू शकतो.
करबुडव्या संस्था रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:18 AM