Join us

करसंकलनामध्ये झाली २२.५ टक्क्यांनी घट; अ‍ॅडव्हान्स टॅक्समध्येही कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:23 AM

मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये ३,२७,३२०.२० कोटी रुपयांचे करसंकलन झाले होते.

मुंबई : १५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या करसंकलनामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये २२.५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. याबरोबरच अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा भरणाही कमी प्रमाणात झाल्याची माहिती मिळत असली तरी त्याबाबतचा अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत २,५३,५३२.३० कोटी रुपयांचे करसंकलन झाल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये ३,२७,३२०.२० कोटी रुपयांचे करसंकलन झाले होते. याचाच अर्थ चालू आर्थिक वर्षाच्या दुसºया तिमाहीमध्ये करसंकलन २२.५ टक्क्यांनी कमी झाले आहे.१५ सप्टेंबर ही दुसºया तिमाहीचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची अंतिम मुदत असते. आत्तापर्यंत १,४७,००४.६० कोटी रुपये हे प्राप्तिकर म्हणून जमा झाले आहेत. तर कंपनी करापोटी ९९,१२६.२० कोटी रुपये जमा झाले आहेत. कराच्या या दोन प्रमुख घटकांमुळे दुसºया तिमाहीत २,४६,१३०.८० कोटी रुपये जमा झाले आहेत. याबाबत अद्याप बँकांकडून संपूर्ण आकडेवारी उपलब्ध झालेली नसल्याचे सांगण्यात येते.प्राप्तिकर खात्याचा मुंबई विभाग हा देशातील करसंकलन करणारा सर्वात मोठा विभाग असून, देशातील एकूण करापैकी सुमारे ३३ टक्के कर येथून जमा होतो. यावेळी या विभागातून जमा झालेल्या करामध्ये १३.९ टक्के अशी मोठी घट झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून यंदा ३४८०८.८० कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर जमा झाला असून, कंपनी कराची रक्कम ३२९२१.२० कोटी रुपये एवढी झाली आहे.बंगळुरू विभागामध्ये मात्र वाढदेशातील प्राप्तिकराच्या विविध विभागांपैकी केवळ बंगळुरू विभागामध्ये करसंकलन वाढले आहे. मागील वर्षापेक्षा येथील करसंकलन ९.९ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी याच काळात येथून ३६,९८६ कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. यंदा मात्र ४०,६६५.३० कोटी रुपये करसंकलन झाले आहे. कोची विभागाची कामगिरी ही सर्वात निराशाजनक झाली असून, येथे ४९ टक्के घट झाली आहे.

टॅग्स :कर